लग्नाबद्दल विचारल्यानंतर रणबीर कपूरनं दिलं भन्नाट उत्तर, पाहा VIDEO
Viral Video: बॉलीवूडमधलं (Bollywood) लव बर्ड्स (Love Birds) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरचं विवाहबंधनात (Marriage) अडकणार असल्याचा अंदाज सध्या अनेकजण व्यक्त करत आहेत. यातच रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियात (Social media) नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओत तो लग्नाबद्दल बोलताना दिसला आहे.
मुंबई, 17 डिसेंबर : बॉलीवूडमधलं लव बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरचं विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज सध्या अनेकजण व्यक्त करत आहेत. यातच रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियात नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओत तो लग्नाबद्दल बोलताना दिसला आहे. हा व्हिडिओ कुठल्यातरी एका कार्यक्रमातला असून तिथे त्यांनं लग्नावर भाष्य केलं आहे.
यावेळी तेथील एका महिला पत्रकारानं विचारलं की, "तु या पोषाकात एकदम फरफेक्ट नवरदेव असल्यासारखा दिसतोय, तर तू लग्न कधी करणार आहेस? यावर रणबीर कपूरनं विनोदी पद्धतीनं रिपोर्टरला म्हटला की, "तुझं लग्न झालंय का? नसेल झालं तर मी तुझ्याशी लग्न करेल" त्याच्या या विनोदी प्रतिक्रियेमुळं उपस्थितांमध्ये हशा पिकला. हा व्हिडिओ झूम टीव्हीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला असून प्रचंड व्हायरल होतं आहे.
अलीकडेच रणबीर कपूर आलियासोबत गोव्यात सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग सामना पाहायला आला होता. यावेळी त्यांनी दोघांनी टीम मुंबई सिटी एफसी संघाला आपला पाठिंबा दिला. या बॉलीवूड बर्ड्सचं एक छायाचित्र मुंबई सिटी एफसीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये रणबीर आपल्या संघाच्या निळी जर्सीत आहे तर आलिया पिवळ्या जर्सीमध्ये आहे. यावेळी दोघांनीही फेसमास्क परिधान केला होता. या फोटोच्या कॅपशन मध्ये लिहिलं होतं की 'मुबईला पाठिंबा देण्यासाठी आलेली प्रमुख उपस्थिती'.
अलिकडेचं आलियानं पाली हिल भागात रणबीरच्या घराजवळ आपला नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. त्यामुळं हे स्टार-जोडपं पून्हा एकदा चर्चेत आलं. तसेचं हे दोघं लवकरच लग्नाची तारीख जाहीर करणार का? याबाबत लोकांना उत्सुकता होती. आलिया आणि रणबीर गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच दोघांनीही आपलं प्रेम कधीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचबरोबर आलियाचं कपूर परिवाराशी खूपचं चांगली गट्टी आहे, कारण तिनं अनेकवेळा कपूर परिवाराच्या कौटुंबिक कार्यक्रमांत हजेरी लावली आहे.