मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर कपूर खेळतोय अनुष्का शर्माच्या ड्रेसशी; VIDEO VIRAL, वाचा चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया

रणबीर कपूर खेळतोय अनुष्का शर्माच्या ड्रेसशी; VIDEO VIRAL, वाचा चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया

 मुलाखतीदरम्यान रणबीर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या(Anushka Sharma)कपड्यांशी खेळत असलेला दिसत आहे.

मुलाखतीदरम्यान रणबीर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या(Anushka Sharma)कपड्यांशी खेळत असलेला दिसत आहे.

मुलाखतीदरम्यान रणबीर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या(Anushka Sharma)कपड्यांशी खेळत असलेला दिसत आहे.

मुंबई, 24 एप्रिल : बॉलीवूडमधील(Bollywood)एक प्रसिद्ध घराणं असलेल्या कपूर घराण्यातील ऋषी कपूर आणि नीतू सिंग कपूर या कलाकार जोडीचा मुलगा असलेल्या रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. देखणा चेहरा,नृत्य कौशल्य आणि उत्तम अभिनय यामुळे रणबीर कपूरनं अल्पावधीतच आपल एक स्थान निर्माण केलं. ‘ए दिल है मुश्कील’,बर्फी अशा चित्रपटांमधून त्यानं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

लाखो तरुणींच्या ह्रदयाची धडकन असणाऱ्या सुपरस्टाररणबीर कपूरचा गेल्या दोन वर्षांत एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्यामुळं त्याचे चाहते आता इन्स्टाग्रामवर (Instagram) त्याचे जुने व्हिडिओ पाहत आहेत. रणबीर कपूर स्वत: सोशल मीडियावर नसला तरी त्याचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. सध्या त्याच्या जुन्या व्हिडिओंचा एक माँटेज (काही व्हिडिओ एकत्र करून केलेला एक व्हिडिओ)इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यामध्ये मुलाखतीदरम्यान रणबीर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या(Anushka Sharma)कपड्यांशी खेळत असलेला दिसत आहे.

हे ही वाचा-नोरा फतेहीने या हॉलिवूड अभिनेत्रीला केलं कॉपी;Same to Same ड्रेसचे PHOTO व्हायरल

‘ए दिल है मुश्किल’,बॉम्बे वेलवेट आणि संजूया चित्रपटांच्या वेळी झालेल्या या वेगवेगळ्या मुलाखतींचे हे व्हिडिओ असून, त्यामध्ये अनेक सह कलाकार आहेत. यामध्ये मुलाखत सुरू आहे,अनुष्का शर्मा उत्साहानं प्रश्नांना उत्तरं देत आहे,रणबीर मात्र अनुष्काच्या गाऊन किंवा ड्रेसच्या काठाबरोबर खेळण्यात हरवल्याचे दिसत आहे .त्याचं हे वागणं त्याच्या चाहत्यांना अतिशय निरागस, मजेशीर वाटत असून,त्यांनीही मजेदार प्रतिक्रिया यावर दिल्या आहेत.एका चाहत्यानं ‘विराटला याच्याबद्दल माहित आहे ना?अशी प्रतिक्रिया दिली आहे,तर एकानं‘व्हाय सो क्यूट रणबीर’ असं म्हटलं आहे.

2016मध्ये आलेल्या‘ऐ दिल है मुश्किल’(A Dil Hai Mushkil)या चित्रपटात रणबीर आणि अनुष्काच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक झालेहोते. हे दोघेही खूपचांगले मित्र आहेत त्यामुळं अनुष्काला रणबीरचं असं हे बालिश वागणं खटकत नसावं. 2015 मध्ये त्यांच्या‘बॉम्बे वेलवेट’या चित्रपटाचे प्रमोशन करताना तिनं म्हटलं होतं की,रणबीर कपूरच्या अशा वागण्यामुळं तिला स्वतःचे मूल होण्याआधीच आईपणाचे धडे गिरवायला मिळाले आहेत. भारतीय क्रिकेटपटूविराट कोहलीशी विवाहबद्ध झालेल्या अनुष्कानं यंदा जानेवारी महिन्यात आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे.

First published:

Tags: Anushka sharma, Bollywood, Ranbir kapoor