मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर कपूरच्या मोबाईलवर आलियाचा नव्हे तर 'या' व्यक्तीचा आहे वॉलपेपर, फोटो पाहून येईल लक्षात खरं कारण

रणबीर कपूरच्या मोबाईलवर आलियाचा नव्हे तर 'या' व्यक्तीचा आहे वॉलपेपर, फोटो पाहून येईल लक्षात खरं कारण

 रणबीर आणि आलिया सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी जात असताना सोमवारी एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी फोटोग्राफर त्यांचे फोटो घेत असताना, रणबीरच्या फोनवरील वॉलपेपर (Wallpaper) कॅमेऱ्यात कैद झाला.

रणबीर आणि आलिया सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी जात असताना सोमवारी एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी फोटोग्राफर त्यांचे फोटो घेत असताना, रणबीरच्या फोनवरील वॉलपेपर (Wallpaper) कॅमेऱ्यात कैद झाला.

रणबीर आणि आलिया सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी जात असताना सोमवारी एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी फोटोग्राफर त्यांचे फोटो घेत असताना, रणबीरच्या फोनवरील वॉलपेपर (Wallpaper) कॅमेऱ्यात कैद झाला.

मुंबई, 22 मार्च- गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू आहे. या दोघांच्या नात्याविषयी त्यांच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. रणबीर आणि आलिया सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी जात असताना सोमवारी एअरपोर्टवर स्पॉट झाले. यावेळी फोटोग्राफर त्यांचे फोटो घेत असताना, रणबीरचा मोबाईलही त्यात कैद झाला. त्याच्या फोनवरील वॉलपेपर (Wallpaper) हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रणबीरने त्याच्या मोबाईलवर ज्येष्ठ अभिनेते आणि त्याचे वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवला आहे. त्यामुळे हा वॉलपेपर पाहताच या दोन्ही अभिनेत्यांचे फॅन्स काहीसे भावूक होताना दिसत आहेत.

एअरपोर्टवर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे फोटोग्राफ घेत असताना, रणबीरचा मोबईलही फोटोमध्ये कैद झाला. त्याच्या मोबाईलवरील ऋषी कपूर यांचा वॉलपेपर पाहून त्यांचे चाहते काहीसे भावूक झाले आहेत. विशेष म्हणजे हा फोटो 2018 मध्ये ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून (Twitter) शेअर केला होता. रणबीरचं वडिलांविषयी असलेलं प्रेम पाहून फॅन्सनी त्याचं कौतुक केलं आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा `शर्माजी नमकीन` हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचं निधन झालं होतं. ऋषी यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी हा चित्रपट पूर्ण केला.

वाचा-आपल्याला ह्यात ओढू नका! राजकीय उमेदवारासाठी मराठी अभिनेत्याचा फोट

अनेक चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका करणारा रणबीर कपूर लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रणबीरसह आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय हे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून आलिया आणि रणबीर ही जोडी प्रथमच पडद्यावर झळकत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या जवळ आले होते.

शर्माजी नमकीन या चित्रपटासाठी यापूर्वी रणबीर कपूरची निवड करण्यात आली होती. `व्हीएफएक्स`च्या (VFX) माध्यमातून रणबीरने या चित्रपटात काम करण्याबाबत विचार सुरू होता. रणबीरला प्रोस्थेटिक आणि `व्हीएफएक्स`च्या माध्यामातून चित्रपटात भूमिका साकारता येईल का याचा अंदाज घेतला गेला. मात्र नंतर या भूमिकेसाठी परेश रावल याचं नाव निश्चित करण्यात आलं, ``असं हितेश भाटिया यांनी नुकतंच सांगितलं.

वाचा-यह टायर तो फायर निकला...अमोल कोल्हेंचा टायरनं काढला घाम,Video Viral

ऋषी कपूर यांचा हा शेवटचा चित्रपट असल्यामुळे आमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. त्याचा विचार करुन त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. हे खूप कठीण काम होतं, पण सर्वकाही चांगलं झाल्याने, मला याचा आनंद आहे,`` असं हितेश भाटिया म्हणाले.

शर्माजी नमकीन` या चित्रपटात परेश रावल, जुही चावला, सोहेल नायर, तारुक रायना, सतीश कौशिक, शीबा चढ्ढा आणि ईशा तलवार हे भूमिका साकारत आहेत. रणबीरदेखील वडिलांचा शेवटचा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सूक आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल असल्याचं रणबीरनं काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओत सांगितलं होतं.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor