रणबीर कपूरने सोडलेल्या या 5 सिनेमांनी सुपरस्टार झाला रणवीर सिंग

रणबीरने सिनेमा नाकारल्यानंतर तो सिनेमा रणवीरकडे गेला आणि त्या संधीचं रणवीरने सोनं केलं.

  • Share this:

रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार आहेत. या दोघांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते चित्रपटगृहात गर्दी करतात. दोघांनीही एकाहून एक सरस सिनेमांत काम केलं.

फार कमी लोकांना हे माहीत आहे की, रणबीरने सिनेमा नाकारल्यानंतर तो सिनेमा रणवीरकडे गेला आणि त्या संधीचं रणवीरने सोनं केलं. या यादीत गली बॉय सिनेमाही आहे.

असं म्हटलं जातं की, दिग्दर्शिका झोया अख्तरला गली बॉय सिनेमात रणबीर कपूरने काम करावं अशी झोयाची इच्छा होती. पण, काही कारणांमुळे रणबीरने हा सिनेमा नाकारला. त्यानंतर रणवीरकडे ही भूमिका गेली.

‘द एशियन एज’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दिल धडकने दो सिनेमासाठीही झोयाची पहिली निवड कपूर कुटुंबाचे भाऊ- बहीण होते. रणबीर आणि करिनाने भूमिका करावी अशी झोयाची इच्छा होती. मात्र सिनेमात रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्राने ही भूमिका वठवली. ‘दिल धडकने दो’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

रणवीर सिंहसाठी 2018 हे वर्ष फार खास होतं. गेल्या वर्षी त्याच्या नावावर रोहित शेट्टीचा सिंबा आणि संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत या दोन सुपरहिट सिनेमांची नोंद झाली.

असं म्हटलं जातं की, संजय लीला भन्साळी यांनी खिलजीच्या भूमिकेसाठी सुरुवातीला रणबीरला विचारलं होतं. मात्र रणबीरने ही भूमिका करायला स्पष्ट नकार दिला.

रणबीरने संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया सिनेमातून सिनेकरिअरला सुरुवात केली. या सिनेमाकडून अनेकांना अपेक्षा होत्या. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत आपटला होता. या सिनेमानंतर रणबीरने भन्साळींसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.

भन्साळी यांनी पद्मावतसह रामलीला आणि बाजीराव मस्तानी सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की रणबीर कपूरने ज्या सिनेमांना नकार दिला ते सिनेमे शेवटी रणवीरकडे आले आणि त्याच सिनेमांनी रणवीर सिंग स्टार झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 12:16 PM IST

ताज्या बातम्या