VIRAL VIDEO : चाहत्याच्या 'त्या' कृतीमुळे रणबीर कपूर होतोय ट्रोल

VIRAL VIDEO : चाहत्याच्या 'त्या' कृतीमुळे रणबीर कपूर होतोय ट्रोल

सध्या आलिया आणि रणबीर वाराणसीमध्ये त्यांचा आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रचं शूटिंग पूर्ण करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 जून : अभिनेता रणबीर कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतो. कधी अलिया भटशी असलेली रिलेशनशिप तर कधी फोटोग्राफर्स किंवा चाहत्यांशी मस्कारीच्या मूडमध्ये साधलेला संवाद. रणवीर सोशल मीडियाचा वापर करत नसला तरीही त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सध्या आलिया आणि रणबीर वाराणसीमध्ये त्यांचा आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रचं शूटिंग पूर्ण करत आहेत. या शूटिंग दरम्यान रणबीर त्याच्या एका चाहत्याला भेटला. त्यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या भेटी दरम्यान चाहत्यानं असं काही केलं की त्यामुळे सध्या रणबीरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावं लागत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर त्याचा चाहत्याला भेटताना दिसत आहे. त्यावेळी तो चाहता अचानक रणबीरला वाकून नमस्कार करतो आणि त्याला एक गिफ्ट बॉक्स देतो. रणबीर त्याच्यासोबत बोलत बोलत सोफ्यावर जाऊन बसतो आणि ते गिफ्ट खोलतो. त्यावेळी त्याला भेटायला आलेला चाहता जमिनीवर बसलेला दिसत आहे.

View this post on Instagram

Fan meet with #ranbirkapoor ❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रणबीरच्या चाहत्याशी झालेल्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होत असून चाहत्यानं वाकून नमस्कार केल्यानं रणबीरला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरनं म्हटलंय, रणबीर देव आहे का जे त्याला तो नमस्कार करतोय आणि रणबीरनं त्याला सोफ्यावर बसायला का नाही सांगितलं. हे खूप चुकीचं आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, चाहत्याला भेटतो आहेस तर निदान त्याला घाबरवू तरी नको. तू शांतपणे त्याच्याशी बसून बोलू शकतोस.

सध्या रणबीर कपूर वाराणसीच्या गंगा घाटावर अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमाचं शूटिंग पूर्ण करत आहे. या सिनेमात पहिल्यांदाच तो आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.  रणबीर आणि आलिया व्यतिरिक्त या सिनेमात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

First published: June 8, 2019, 6:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading