Home /News /entertainment /

आलियाशी लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नावर रणबीरचं अनोखं उत्तर

आलियाशी लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नावर रणबीरचं अनोखं उत्तर

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी दिल्लीत अयान मुखर्जी दिग्दर्शित आपल्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच केले. ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16  डिसेंबर-   बॉलिवूड    (Bollywood)   अभिनेता रणबीर कपूर   (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट   (Alia Bhatt)  यांनी दिल्लीत अयान मुखर्जी दिग्दर्शित आपल्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच केले. ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. यावेळी त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. दरम्यान एका व्यक्तीने रणबीरच्या लग्नाची तारीख जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पाहूया रणबीरने त्याला काय उत्तर दिले.. या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित चाहते रणबीरला चिअरअप करत होते. त्याचवेळी रणबीर चाहत्यांकडून आलेले प्रश्न वाचत होता. त्यात त्याला एक असा प्रश्न विचारण्यात आला होता, जो वाचून अलियाच्यासुद्धा भुवय्या उंचावल्या. या चाहत्याने रणबीरला विचारलं होतं, 'तू आलियाशी किंवा इतर कोणाशी कधी लग्न करणार आहेस? प्रश्नाचा दुसरा भाग ऐकून आलिया थोडी नाराज झाली. मात्र या प्रश्नाला आपल्या खास अंदाजात उत्तर देत रणबीर कपूरने म्हटलं, 'गेल्या वर्षभरात अनेक लग्नसोहळे झाले आहेत. मला वाटतं आपण या मध्येच आनंदी असलं पाहिजे'.
  रणबीरने घेतली आलियाची फिरकी- या कार्यक्रमामध्ये रणबीर कपूर फारच माजमस्ती करताना दिसून आला. यावेळी त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची फारच मजेशीर उत्तरेदेखील दिली. दरम्यान त्याने आलियाची फिरकी घेत म्हटलं, आपलं लग्न कधी होणार, यावर आलिया लाजत म्हणाली हे तू मला का विचारत आहेस? यावर रणबीरने तिच्या बाजूला उभारलेल्या आपल्या दिग्दर्शकाकडे बोट करत म्हटलं मी तर अयानला विचारत आहे. यावर उपस्थितांमध्ये एकच हश्या पिकला. यावेळी उत्तर अयान मुखर्जीने म्हटलं, 'आजसाठी फक्त एकच डेट पुरेशी आहे, आणि ती म्हणजे ब्रह्मास्त्रच्या पोस्टर रिलीजची डेट'. रणबीर आणि आलिया 2017 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत.या चित्रपटामुळेच ते एकत्र आले होते. त्यांचे एकमेकांच्या कुटुंबासोबतचे नाते आता घट्ट झाले आहे आणि ते सर्व एकत्र सुट्टीवरदेखील जातात. गेल्या वर्षी एका मुलाखतीत रणबीरने म्हटले होते की, कोविड-19 महामारी नसती तर आलियासोबत त्याने लग्न केले असते.काही दिवसांपूर्वी रणबीरच्या वाढदिवसाला आलिया आणि रणबीर एका सिक्रेट प्लेसवर सेलिब्रेशनसाठी गेले होते. यावेळी आलियाने आपल्या दोघांचा फोटो शेअर करत आपलं नातं सर्वांसमोर उघड केलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Alia Bhatt, Entertainment, Ranbir kapoor

  पुढील बातम्या