2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने

दिवाळी, ईद, ख्रिसमस हे सण बाॅलिवूडसाठी महत्त्वाचे असतात. या दिवशी मोठा सिनेमा रिलीज होत असतो. चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2018 03:49 PM IST

2019च्या ख्रिसमसला रणबीर-सलमान येणार आमनेसामने

मुंबई, 13 नोव्हेंबर : दिवाळी, ईद, ख्रिसमस हे सण बाॅलिवूडसाठी महत्त्वाचे असतात. या दिवशी मोठा सिनेमा रिलीज होत असतो. चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन मोठे सिनेमे पुढच्या ख्रिसमसला रिलीज होणार आहेत. रणबीर आणि सलमान आमनेसामने येणार आहेत.


बाॅलिवूडचे लव्ह बर्ड्स रणबीर-आलिया यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. ब्रम्हास्त्र सिनेमा कधी रिलीज करणार याचं ट्विट निर्माता करण जोहरनं केलंय. हा सिनेमा 2019च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे.Loading...आलिया भट्ट या सिनेमाबद्दल खूपच उत्साहित आहे. ती म्हणाली, ' हा सिनेमा एक पाऊल पुढे आहे. भारतात अशा प्रकारचे सिनेमे कधी बनले नव्हते.' ब्रम्हास्त्र सिनेमा एक रोमँटिक कथा आहे आणि त्याला सुपरनॅचरल शक्तीची जोड आहे. रणबीर आणि आलिया यांचा रोमान्स सिनेमात पहायला मिळणार आहेच. पण त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची हटके भूमिका या सिनेमात असेल.


ब्रम्हास्त्रचा पहिला भाग पुढच्या नाताळला रिलीज होतोय. तीन भागांमध्ये हा सिनेमा आहे. बल्गेरियात सिनेमाचं शूटिंग झालं.


अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या शूटिंगसाठी बल्गेरियात होते, तेव्हाचा किस्सा. तिथे असलेल्या धुंद वातावरणात सेटवरील कुणीतरी इथं मस्त गरमागरम समोसे आणि वडापाव खायला मिळाला तर काय मज्जा येईल अशी इच्छा व्यक्त केली.  बिग बींनी लगोलग ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कूकला सांगून संपूर्ण क्रूसाठी गरमा गरम वडापाव आणि सामोसे बनवायला सांगितले. त्यानंतर स्वतः सोशल मीडियाद्वारे ही बातमी आपल्या फॅन्सनाही सांगितली. सेटवर सगळ्यांनी त्याच्यावर मस्त ताव मारला.


याशिवाय सलमान खानच्या किकचा सिक्वलही रिलीज होतोय. तोही 2019च्या ख्रिसमसलाच होणार आहे. रेस-3, किक-2, दबंग-3  आणि भारत या सिनेमांमध्ये सलमान बिझी आहे. किक 2मध्ये सलमान दोन भूमिकांमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यात तो नकारात्मक भूमिकेत आहे. 2019 सलमानसाठी महत्त्वाचं वर्ष आहे. त्याचे भारत आणि किक 2 हे दोन मोठे सिनेमे रिलीज होतायत.


#TRPमीटर : राधिका आणि विक्रांत सरंजामेला 'याने' टाकलं मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...