मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आलिया नाही तर श्रद्धा कपूरसह रोमान्स करताना दिसणार रणबीर कपूर, डान्सचा VIDEO लीक

आलिया नाही तर श्रद्धा कपूरसह रोमान्स करताना दिसणार रणबीर कपूर, डान्सचा VIDEO लीक

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही जोडी पहिल्यांदाच लव्ह रंजन (Luv Ranjan) च्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या सिनेमातील एक डान्स व्हिडीओ सध्या लीक झाला आहे

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही जोडी पहिल्यांदाच लव्ह रंजन (Luv Ranjan) च्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या सिनेमातील एक डान्स व्हिडीओ सध्या लीक झाला आहे

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही जोडी पहिल्यांदाच लव्ह रंजन (Luv Ranjan) च्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या सिनेमातील एक डान्स व्हिडीओ सध्या लीक झाला आहे

मुंबई, 20 मार्च: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही जोडी पहिल्यांदाच लव्ह रंजन (Luv Ranjan) च्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहे. दरम्यान या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू असून पुढच्या वर्षी 8 मार्च 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव अद्यापही गुलदस्त्यात (Ranbir Kapoor and Shraddha Kapoor movie name) आहे. लव्ह रंजन दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटिंग सेटवरुन एक व्हिडीओ सध्या लीक झाला आहे. ज्यामध्ये श्रद्धा-रणबीर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रद्धा-रणबीरचा डान्स व्हिडीओ सिनेमातील डान्सच्या रिहर्सल दरम्यानचा आहे, अशी माहिती मिळते आहे. हे दोन्ही कलाकार यामध्ये ट्रेडिशनल अंदाजात दिसत आहेत. याठिकाणी उभारण्यात आलेला सेटही मोठा आहे. तर बरेच बॅकग्राउंड डान्सर्स या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

हे वाचा-कंगनाच्या शोमध्ये या स्पर्धकाने तिच्याशीच घेतला पंगा, म्हणाली-माझं तोंड तू बंद..

काय आहे व्हायरल व्हिडीओ?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला रणबीर कपूर उलटा चालत येत डान्स करताना दिसतो आहे तर श्रद्धा कपूर पिवळ्या रंगाच्या सुंदर घागऱ्यामध्ये त्याच्याकडे चालत येते आहे. जेव्हा कॅमेरा विरुद्ध दिशेला पॅन होतो त्याठिकाणी रंगीबेरंगी कपड्यातील बरेच लोकं खाली उभे असलेले पाहायला मिळत आहेत. या व्हायरल व्हिडीओनुसार या गाण्याचा सेट एखाद्या भव्य हवेलीमध्ये असाला असा अंदाज आहे. बॉलिवू़ड तडका असणारं हे गाणं कोणतं असेल याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

बोनी कपूर करणार अभिनयात पदार्पण

रिपोर्ट्सनुसार, चित्रपट निर्माते बोनी कपूर या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. अर्थाच बॉलिवूडमध्ये अभिनयात बोनी कपूर यांचा हा डेब्यू असेल. डिंपल कपाडिया रणबीरच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे वाचा-‘The Kashmir Files'सोबत मंजुळेंच्या चित्रपटाची 'झुंड',निर्मात्याने खडा केला सवाल

या सिनेमाच्या दिग्दर्शकाबाबत बोलायचं झालं तर लव्ह रंजन ‘प्यार का पंचनामा’आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या अनटायटल्ड नव्या सिनेमातही कॉमेडी आणि रोमान्सचा तडका असणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published:
top videos

    Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor, Shraddha kapoor