मुंबई,23 एप्रिल- बॉलिवूड
(Bollywood) अभिनेता रणबीर कपूर
(Ranbir Kapoor) आणि नॅशनल क्रश साऊथ सुंदरी रश्मिका मंदना
(Rashmika Mandanna) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची बातमी नुकतंच आम्ही दिली होती. त्यांनतर आता या चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रश्मिका आणि रणबीर एक सीन शूट करण्याच्या तयारीत असलेले दिसून येत आहेत.
एन्टरटेनवूडने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ रणबीर आणि रश्मिकाच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील आहे. लवकरच दोघेही 'अॅनिमल'
(Animal) या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग 22 एप्रिलपासून सुरु झालं आहे. शूटिंगच्या पहिल्याच दिवशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. हा व्हिडीओ लीक होताच प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीर आणि रश्मिका रस्त्याच्या बाजूला उभे असलेले दिसत आहेत. दिग्दर्शक त्यांना सीन समजावून सांगत असल्याचं दिसून येत आहे. यावेळी रणबीर कपूर पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये दिसून येत आहे. तर दुसरीकडे रश्मिका पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीमध्ये अगदी ट्रॅडिशनल अंदाजात दिसून येत आहे. त्यांच्या आजूबाजूला सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. या चित्रपटाचं शूटिंग मनालीमध्ये चालू असल्याचं म्हटलं जात आहे. कारण नुकतंच रणबीर आणि रश्मिका मनालीसाठी रवाना झाले होते.
रणबीर कपूरच्या आगामी 'अॅनिमल' या चित्रपटात पुष्पा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.रश्मिका सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. पुष्पा आणि श्रीवल्ली हे नाव सध्या घराघरात तोंडपाठ झाले आहे. या कलाकारांचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आता प्रतीक्षा करत आहेत. आज या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून रश्मिका 'मिशन मजनू' या पहिल्या हिंदी चित्रपटात व्यग्र होती. जो 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.