News18 Lokmat

अवॉर्ड फंक्शनमध्ये कतरिनाला पाहताच तिच्याकडे गेला रणबीर, पाहत राहिली आलिया भट्ट

गेल्या वर्षापासून रणबीरने आलिया भट्टला डेट करायला सुरुवात केली. यावेळी कतरिनासोबतचं रणबीरचं बॉण्डिंग पाहणं प्रेक्षकांसाठी धक्कादायक होतं.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 08:01 PM IST

अवॉर्ड फंक्शनमध्ये कतरिनाला पाहताच तिच्याकडे गेला रणबीर, पाहत राहिली आलिया भट्ट

मुंबई, २४ मार्च- बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याबद्दल तर आता साऱ्यांनाच माहीत आहे. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्सदरम्यान दोघं पूर्णवेळ हातात हात घालून फिरताना दिसले. एका क्षणासाठीही दोघांनी एकमेकांना सोडलं नाही. एवढंच काय तर अवॉर्ड घेण्यासाठीही दोघं एकत्र स्टेजवर गेले.

आलिया आणि रणबीरने कपड्यांमध्ये काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन केलं होतं. दोघं एकमेकांसोबत फार कम्फर्टेबल होते. मात्र या अवॉर्ड फंक्शनला असं काही पाहण्यात आलं की ज्याचा विचार कोणीच करणार नाही. रणवीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफही या पुरस्कार सोहळ्याला हजर होती. २०१६ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं.

रणबीर- कतरिनाने सात वर्ष एकमेकांना डेट केलं. मात्र त्या नंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या अवॉर्ड फंक्शनमध्ये ब्रेकअपनंतर पहिल्यांदा रणबीर आणि कतरिना समोरासमोर आले. दोघांनी काही वेळ एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारत किस केलं.


कतरिना आणि रणबीर एकमेकांना भेटताचे आणि किस करताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघं एकमेकांना असे भेटले जसं दोघांमध्ये काहीच झालं नाही. काही दिवसांपूर्वी रणबीरचं दीपिकासोबतही असंच बॉण्डिंग पाहायला मिळालं. दीपिकाही रणबीरची एक्स गर्लफ्रेंड होती.

Loading...

एका कार्यक्रमासाठी दोघं भेटले होते. इथे रणबीर दीपिकाला मिठी मारताना आणि किस करताना दिसला. गेल्या वर्षापासून रणबीरने आलिया भट्टला डेट करायला सुरुवात केली. रणबीरच्या आयुष्यात आलिया येताच त्याचे दोन्ही एक्स गर्लफ्रेंडसोबतची नाती सुधारली. यातही कतरिनासोबत चांगली बॉण्डिंग पाहणं प्रेक्षकांसाठी धक्कादायक होतं.

VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...