S M L

दीपिका पदुकोण आणि रणबीर पुन्हा एकदा येतायत जवळ

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर एक्स बाॅयफ्रेंड-गर्लफ्रेंड होते. दोघांचं नातं तुटल्यावरही दोघांनी सिनेमे केले.

Updated On: Nov 7, 2018 02:41 PM IST

दीपिका पदुकोण आणि रणबीर पुन्हा एकदा येतायत जवळ

मुंबई, 07 नोव्हेंबर : दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर एक्स बाॅयफ्रेंड-गर्लफ्रेंड होते. दोघांचं नातं तुटल्यावरही दोघांनी सिनेमे केले. आपल्या व्यावसायिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. आता पुन्हा एकदा ते दोघं एकत्र येतायत.


आता ते कुठल्या सिनेमात काम करत नाही. तर ते एका जाहिरातीत एकत्र येतायत. दीपिकाबरोबर या जाहिरातीची बोलणी सुरू होती. नंतर त्यात रणबीरही आहे कळल्यावर दीपिकानं उत्साहच दाखवला, असं डीएनएच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. दीपिकानं ट्विट करून लग्नाची तारीख सांगितली. 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघांचं लग्न होणार आहे. लग्नाला काही दिवस बाकी असताना लग्नात सुंदर दिसण्यासाठी दीपिका सध्या सलॉनला भेट देत आहे. या फोटोमध्येही तिचा अगदी सिंपल पण हटके लूक पाहायला मिळत आहे.


Loading...

लग्नातील दीपिकाचा ड्रेस हा सब्यसाची मुखर्जी डिझाईन करणार आहेत. सब्यसाची नावाने हा एक ड्रेसचा प्रकार आहे. अनुष्का शर्माने तिच्या लग्नातील ड्रेस सब्यसाची कडून डिझाईन केला होता.


लग्नानंतर लगेचच रणवीर आणि दीपिका हनिमूनला जाणार आहेत. तेथून आल्यावर रणवीर त्याच्या सिंबा चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त होईल.


मध्यंतरी, एका मुलाखतीत दीपिकाला विचारलं होतं. रणवीरचं पहिलं इम्प्रेशन कसं होतं? या प्रश्नावर दीपिका म्हणाली, ' त्याचा बँड बाजा बारात सिनेमा मी पाहिला होता. त्यावेळी माझा एजंट म्हणाला हा मोठा स्टार बनेल. पण मीच म्हटलं, मला नाही असं वाटत.'


एवढंच नाही, तर दीपिकानं सांगितलं, रणवीर तिच्या टाइपचा नाही. पण त्याचा अभिनय पाहून मी प्रभावित झालीय. त्यानं दिल्लीच्या मुलाचा अभिनय इतका तंतोतंत केला की मला माहीतच नव्हतं तो मुंबईचा आहे म्हणून.


Birthday Special : सदमा ते विश्वरूपम, कमल हासन बाॅक्स आॅफिसवर हिट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 02:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close