Home /News /entertainment /

दीपिका समजून बाथरूमध्ये अंघोळ करणाऱ्या तिच्या आईशीच केलं रणबीरने फ्लर्ट, जुना VIDEO व्हायरल

दीपिका समजून बाथरूमध्ये अंघोळ करणाऱ्या तिच्या आईशीच केलं रणबीरने फ्लर्ट, जुना VIDEO व्हायरल

'ये जवानी है दीवानी' या चित्रपटातील एक सीन जोरदार व्हायरल होत आहे. चित्रपटामध्ये या सीनवर कात्री लावली असली तरी सध्या सोशल मीडियावर या सीनची खूप चर्चा आहे.

  मुंबई, 23 एप्रिल : दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे जरी बॉलिवूडमधील सर्वांचं आवडतं कपल असलं, तरी अनेक फॅन्स असे आहेत की ऑनस्क्रीन दीपिका आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हीच जोडी अनेकांना आवडते. मग 'तमाशा' असो किंवा 'ये जवानी है दीवानी', दोघांची जोडी प्रेक्षकांच्या कायम पसंतीस उतरली आहे. दरम्यान 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटातील एक सीन जोरदार व्हायरल होत आहे. हा सीन तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला मिळणार नाही, कारण या सीनवर कात्री लावण्यात आली होती. मात्र सध्या पुन्हा एकदा हा सीन चर्चेत आला आहे. (हे वाचा-सलमान खानकडून राष्ट्रवादी नेत्याच्या फिटनेसचं कौतुक, VIDEO पाहून व्हाल थक्क) यामध्ये रणबीर कपूर अर्थात 'कबीर थापर' म्हणजेच बनी सिनेमाची नायिका 'नैना तलवार' म्हणजेच दीपिका पदुकोण हिच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो. नैना बाथरूमध्ये आहे असं समजून तो फ्लर्ट करण्यास सुरूवात करतो. पण होतं भलतच, तो ज्या महिलेशी फ्लर्ट करत असतो ती या चित्रपटातील नैनाची आई असते. जेव्हा नैना मागून येते तेव्हा बनीला एकदम धक्काच बसतो आणि तिची आई बाथरूमधून बाहेर आल्यानंतर तर त्याची बोबडीच वळते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र चित्रपटातून हा सीन कापण्यात आला आहे.
  हा सीन तेव्हाचा आहे जेव्हा बनी आणि नैना आदितीच्या लग्नासाठी जयपूरमध्ये आलेले असतात. बनी काही दिवसांत लगेचच त्याच्या कामासाठी परत जाणार असल्याने ते जयपूर फिरण्याचा प्लॅन बनवतात. चित्रपटातून हा सीन कापण्यात आला असला तरी  सध्या सोशल मीडियावर तो खूप हिट झाला आहे. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता, तरी सुद्धा आजही YJHD चे लाखो फॅन्स आहेत. चित्रपटातील गाणी देखील विशेष प्रसिद्ध झाली होती. संपादन - जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Ranbir kapoor

  पुढील बातम्या