VIDEO : जेव्हा रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतो...

VIDEO : जेव्हा रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतो...

कुठल्या तरी कार्यक्रमातून बाहेर पडताना रणबीरनं आलियाला 'मी तुला ड्राॅप करतो' असं म्हटलं. तशी आलिया पटकन रणबीरच्या कारमध्ये जाऊन बसली.

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या हाॅट टाॅपिक आहेत. दोघांच्या अफेअरबद्दल जोरदार चर्चा आहे. त्यांचे जुने फोटोज, व्हिडिओज सध्या व्हायरल होतायत. असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. कुठल्या तरी कार्यक्रमातून बाहेर पडताना रणबीरनं आलियाला 'मी तुला ड्राॅप करतो' असं म्हटलं. तशी आलिया पटकन रणबीरच्या कारमध्ये जाऊन बसली.

हा व्हिडिओ व्हायरल झालाय. रणबीर आलियाला लिफ्ट आॅफर करतोय. खरं तर हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. पण सध्याची अफेअरची चर्चा पाहता, तो आत्ताचाच वाटतो. याचं कारण दोघांमध्ये एकदम कम्फर्ट लेव्हल दिसतेय. बाॅण्डिंग दिसतंय.

दोघांची मैत्री जुनी आहे. आलिया रणबीरसोबत ब्रम्हास्त्र सिनेमा करतेय. त्याचं दिग्दर्शन इम्तियाज अलीचं आहे. त्याआधी झोया अख्तरच्या गली बाॅयचं शूटिंग तिनं पूर्ण केलंय. रणबीरचा संजू तर सुपरडुपर हिट झालाय. आलियाही एक चांगली अभिनेत्री आहे. त्यामुळेच आगामी ब्रम्हास्त्र सिनेमा बाॅक्स आॅफिसवर कमाल करेल, असं वाटतंय. त्यात बिग बींचीही भूमिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 01:14 PM IST

ताज्या बातम्या