मुंबई, 16 मे : रणबीर कपूर आणि आलिया भट काही दिवसांपूर्वी युरोप ट्रिपला गेले होते. ते नुकतेच भारतात परतले असून त्यांच्या युरोप ट्रिपमुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. असं म्हटलं जातंय की रणबीर आणि आलिया इटलीच्या 'लेक कोमो' येथे डेस्टिनेशन वेडिंगचा प्लानिंग करत असून यासाठीच ते युरोपला गेले होते. पण आलियानं मात्र आमचा असा कोणताही प्लान नसल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम लावला.
नुकत्याच एका मुलाखतीत आलियाला तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगचं लोकेशन ठरवण्यासाठी युरोपला गेला होता का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आलिया म्हणाली, 'असं काहीही नाही. आम्ही फक्त सुट्टी एंजॉय करण्यासाठी तिथे गेलो होतो. लोकांना जे बोलायचं ते बोलू द्या मला काही फरक पडत नाही.' याआधी आलियाची आई सोनी राजदान यांनीही युरोप ट्रिपच्या या चर्चा फक्त अफवा असल्याचं म्हटलं होतं.
मागच्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीर यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनेकदा या दोघांना एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र फिरताना स्पॉट केलं गेलं आहे. तसेच फिल्म फेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियानं सर्वांसमोर रणबीरला I Love You म्हणत प्रेमाची कबूली दिली होती. रणबीर आणि आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात आलिया-रणबीर सोबत अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा या वर्षाच्या शेवटी म्हणजे ख्रिसमसला रिलीज होणार आहे.
ऋषी कपूर यांना सरप्राइझ द्यायला न्यूयॉर्कला पोहचला 'हा' बालमित्र, नीतू कपूरनी शेअर केला फोटो
Cannes 2019 - कंगना रणौतने 10 दिवसांमध्ये कमी केलं 5 किलो वजन, लोक म्हणाले- अशक्यच!