मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'पाच वर्ष एकत्र घालवली आणि आम्ही लग्न केलं...' लग्नानंतर मिसेस कपूरची पहिलीचं पोस्ट चर्चेत

'पाच वर्ष एकत्र घालवली आणि आम्ही लग्न केलं...' लग्नानंतर मिसेस कपूरची पहिलीचं पोस्ट चर्चेत

लग्नानंतर मिसेस कपूर म्हणजे आलियानं लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर करत एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लग्नानंतर मिसेस कपूर म्हणजे आलियानं लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर करत एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

लग्नानंतर मिसेस कपूर म्हणजे आलियानं लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर करत एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 14 एप्रिल- Alia Ranbir Wedding : आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) आज, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आयुष्य भरासाठी एकमेकांचा हात हातात घेतला आहे. दोघांचा लग्नसोहळा मुंबईत थाटात पार पडला. लग्नानंतर मिसेस कपूर म्हणजे आलियानं लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर करत एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आलियानं लग्नाच्या सुंदर क्षणांचे काही फोटो इन्स्टावर शेअर करत म्हटलं आहे की, आज, एकत्र कुटुंब, मित्रपरिवार यांनी सगळं घर कसं अगदी भरुन गेलं होतं. आमची आवडती जागा ज्या बाल्कनीत आम्ही आमच्या नात्याची पाच वर्ष एकत्र घालवली...आम्ही लग्न केलं. आता नव्या आठवणी जोडण्यासाठी आम्ही अधिक काळ वाट पाहू शकत नाही. अशा आठवणी ज्या प्रेम, हास्य, शांतता, मुव्ही नाईट, वेड्यासारखे वाद. आमच्या आयुष्यातील या खूप महत्त्वाच्या दिवशी आमच्यावर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव करण्यासाठी मनापासून धन्यवाद. या क्षणांना आणखी खास केलं आहे, अशी पोस्ट आलियाने हे फोटो शेअर करत केली आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आलिया आणि रणबीरच्या लग्नाला काही बॉलिवूड सेलेब्सनी हजेरी लावली होती. आलिया आणि रणबीरची एक झलक पाहण्यासठी चाहते देखील उत्सुक होते. आता या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या दोघांच्यावर चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लग्नामध्ये या दोघांचा रॉयल लुक सर्वांचे लक्षवेधून घेणारा असाच आहे.

वाचा- Ranbir kapoor-Alia bhatt wedding pic: क्यूट कपल आलिया-रणबीरच्या रॉयल लुकनं वेधलं लक्ष, प्रेमाच्या रंगात रंगून गेले दोघं!

अशी आहे आलिया-रणबीरची लव्हस्टोरी

आलिया आणि रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.बॉलिवूडमधील या प्रसिद्ध जोडीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आलिया ११ वर्षांची असल्यापासूनच रणबीर कपूर तिला आवडत असल्याचं तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली असताना पहिल्यांदा आलियाने रणबीरला पाहिले.तेव्हा रणबीर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमादरम्यान आलियाने रणबीर सोबत लग्न करण्याची इच्छा देखील बोलून दाखविली होती. यानंतर अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे . एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर आलियाने गेल्याच वर्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रणबीरसाठी खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून हे दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. शेवटी या क्यूट कपलनं आज लग्नगाठ बांधली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor