मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bramhastra Review: 'ब्रह्मास्त्र'चा पहिला रिव्ह्यू आला समोर, आलियाच्या अभिनयासमोर फिका पडला रणबीर?

Bramhastra Review: 'ब्रह्मास्त्र'चा पहिला रिव्ह्यू आला समोर, आलियाच्या अभिनयासमोर फिका पडला रणबीर?

bramhastra

bramhastra

दिग्दर्शक आयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शित होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. मात्र प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 8 सप्टेंबर: दिग्दर्शक आयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शित होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. मात्र प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम केला आहे. पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोटींची कमाई केलेली पहायला मिळाली. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या रिलीजच्या काही दिवस आधीच या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यूही समोर आला आहे.

ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी सेन्सॉर रूममध्ये हा चित्रपट पाहिला आणि याविषयी रिव्ह्यूही दिला आहे. ब्रह्मास्त्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपले मत शेअर करताना उमीर संधूने लिहिले की, 'रणबीर कपूर चित्रपटात खूप गोंधळलेला दिसत आहे. काय चाललंय ते त्याला कळतही नाही. आलिया भट्ट या चित्रपटात स्टनिंग दिसत आहे. मौनी रॉय खूप क्रूर दिसत असून तिच्या अभिनय खूप जोरदार आहे. अमिताभ बच्चन पूर्ण प्रतिष्ठेत आहेत. फक्त दुःख याच गोष्टीचं वाटतंय की, त्यांना कमी फुटेज मिळालं आहे'.

उमेर संधूने पुढच्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'बॉलिवुडमध्ये काल्पनिक साहसी चित्रपट दुर्मिळ आहेत. असा चित्रपट बनवला यासाठी तुम्ही आयान मुखर्जूला प्रोत्साहित करु शकता. चित्रपटाची पटकथा आणि कथा एकदम सरासरी आणि कधी कधी वाईट आहे. उमेर संधूने या चित्रपटासाठी 2.5 स्टार दिले आहेत'.

दरम्यान, भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटावर खूप मेहनत घेतली गेली असली तरी, बराच काळ पैसा पाण्यासारखा वाहून गेला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Amitabh Bachchan, Ranbir kapoor