रणबीर-आलियाचं 'प्यार करेंगे खुल्लम खुल्ला...', व्हिडीओ होतोय व्हायरल

रणबीर-आलियाचं 'प्यार करेंगे खुल्लम खुल्ला...', व्हिडीओ होतोय व्हायरल

झी सिने अवॉर्डच्या मंचावर 'स्टूडंट ऑफ द ईयर'मधील 'इश्कवाला लव्ह' या गाण्यावर आलिया आणि रणबीर डान्स करताना दिसले.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च: सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच हे दोघंही ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे सध्या ते नेहमीच एकत्र दिसतात. पण सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये झी सिने अवॉर्डच्या मंचावर 'स्टूडंट ऑफ द ईयर'मधील 'इश्कवाला लव्ह' या गाण्यावर आलिया आणि रणबीर डान्स करताना दिसत आहेत.
सोनम कपूरच्या लग्नात आपल्या नात्याची जाहीर कबुली दिल्यानंतर एखाद्या स्टेजवर अशाप्रकारे रोमँटिक डान्स करण्याची रणबीर-आलियाची ही पहिलीच वेळ होती. यामुळे रणबीर आलियाच्या 'प्यार करेंगे खुल्लम खुल्ला'ची चर्चा होताना दिसत आहे. पर्सनल लाइफमध्ये रणबीर आणि आलिया यांचे कुटुंबीयांचेही 2018 मध्ये रणबीरनं त्याचा वाढदिवसही त्याची आई नीतू सिंग आणि आलियाची आई सोनी राजदान यांच्यासोबत साजरा केला होता. यावेळचे त्यांचे फोटोही खूप व्हायरल झाले होते.
रणबीर आणि आलिया अनेकदा एकमेकांच्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसत असल्यानं त्यांच्या नात्याला घरच्यांनीही हिरवा कंदिल दाखवल्याचं म्हटलं जात आहे. तसंच 2020 पर्यंत हे दोघंही विवाहबंधनात अडकतील अशाही चर्चा आहेत. पण सध्या हे दोघेही आपापल्या करिअरकडेमध्ये व्यस्त असून एका मुलाखतीत आलियानं मी योग्य वेळ आल्यावर लग्न करेन असं सध्या मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे, असं सांगितलं होतं. आलियाचा कलंक येत्या 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तसेच ती ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर सोबत दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा 'तख्त' आणि संजय लीला भन्साळींचा 'इन्शाअल्लाह' हे चित्रपट आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 01:56 PM IST

ताज्या बातम्या