मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranbir Kapoor-Alia Bhatt च्या मेहंदी सेरेमनीत करण जोहरसह घडला असा प्रकार, स्वत: केला खुलासा; VIDEO

Ranbir Kapoor-Alia Bhatt च्या मेहंदी सेरेमनीत करण जोहरसह घडला असा प्रकार, स्वत: केला खुलासा; VIDEO

आलिया आणि रणबीरच्या लग्नामुळे कपूर आणि भट्ट कुटुंब खूप आनंदी दिसत होती. या दोन कुटुंबांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे जी या लग्नामुळे खूप आनंदी आहे. ती व्यक्ती म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar)

आलिया आणि रणबीरच्या लग्नामुळे कपूर आणि भट्ट कुटुंब खूप आनंदी दिसत होती. या दोन कुटुंबांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे जी या लग्नामुळे खूप आनंदी आहे. ती व्यक्ती म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar)

आलिया आणि रणबीरच्या लग्नामुळे कपूर आणि भट्ट कुटुंब खूप आनंदी दिसत होती. या दोन कुटुंबांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे जी या लग्नामुळे खूप आनंदी आहे. ती व्यक्ती म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar)

मुंबई, 19 एप्रिल: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या बॉलिवूडमधील लव्हबर्ड्सनी गुरुवारी (14 एप्रिल 2022) लग्नगाठ बांधली. पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या या जोडीनं लग्न करून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. जवळची मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील आर. के. हाऊसमध्ये (R K House) हा लग्न सोहळा पार पडला. आलिया आणि रणबीरच्या लग्नामुळे कपूर आणि भट्ट कुटुंब खूप आनंदी दिसत होती.

या दोन कुटुंबांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे जी या लग्नामुळे खूप आनंदी आहे. ती व्यक्ती म्हणजे निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar). आलियाला बॉलिवूड डेब्युची (Bollywood Debut) संधी करणनं दिली होती. या शिवाय तो आलियाला आपली मुलगी मानतो. त्यामुळे आलियाच्या लग्नात करण खूपच उत्साही आणि आनंदी दिसत होता. त्यानं संपूर्ण लग्नात खूप धमाल केली. गंमत म्हणजे भट आणि कपूर फॅमिलीतील सर्व महिलांच्यासोबत त्यानं हाताला मेहंदीही लावली होती. मात्र, या मेहंदी सेरेमनीमध्ये (Mehendi Ceremony) करण जोहरसोबत थोडी गडबड झाल्याचं आता समोर आलं आहे.

हे वाचा-मराठीतील 'या' पाच सेलेब्सची INSTAGRAM वर हवा, 1 मिलियनपेक्षा जास्त आहे फॉलोअर्सची संख्या !

13 एप्रिल रोजी आलिया-रणबीरचा मेहंदी सेरेमनी (Alia-Ranbir Mehendi Ceremony) पार पडला. त्यामध्ये करण जोहर उपस्थित होता. त्यानं मोठ्या हौसेनं आपल्या हातावर मेहंदीदेखील लावून घेतली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्याची अवस्था एखाद्या लहान मुलाप्रमाणं झाली. त्याच्या फक्त हातावरच नाही तर चेहऱ्यावरदेखील मेहंदी लागली होती. 'हुनरबाज' (Hunarbaaz) या रिअॅलिटी शोच्या सेटवर करणनं आलिया-रणबीरच्या मेहंदी सेरेमनीमधील हा किस्सा शेअर केला आहे. तो म्हणाला, 'मी पहिल्यांदाच मेहंदी लावली होती. त्यामुळे हातावर मेहंदी असण्याची मला सवय नाही. त्यात वातावरणातही खूप उष्णता होती आणि घामही खूप येत होता. मी अनावधानानं मेहंदी लावलेल्या हातानंच घाम पुसला. हाताला मेहंदी लावल्याचं मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. परिणामी, माझ्या कपाळावर, तोंडावर आणि डोक्यावर हाताची मेहंदी लागली. त्यानंतर मी लगेच मेहंदी धुवून टाकली. आलियाच्या मेकअप आर्टिस्टनं मला वेगवेगळ्या प्रकारची लोशन लावली नाहीतर माझा चेहरा मेहंदीनं रंगला असता.'

हे वाचा-Tattoo नकोच गं बाई! नागा चैतन्यसाठी 3-3 टॅटू काढणारी समंथा आता असं काय म्हणाली?

'हुनरबाज'च्या निर्मात्यांनी एक क्लिप शेअर केली होती. या क्लिपमध्ये, होस्ट भारती सिंग (Bharti Singh) करणला चिडवत होती. करणणं लग्नात घातलेल्या पिंक शेरवानीमध्ये तो पिंकी दिसत होता, असं भारतीचं म्हणणं होतं. त्यावेळी करणच्या शेजारी बसलेली परिणीती चोप्राही (Parineeti Chopra) भारतीला सामील झाली आणि तिनं करणच्या तळहातावरची खराब झालेलं मेहंदीचं डिझाईन सर्वांना दाखवलं. त्यानंतर करणनी आलियाच्या मेहंदी सेरेमनीमधील हा भन्नाट किस्सा सर्वांना सांगितला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आलिया आणि रणबीर आता ऑफिशियली पती-पत्नी झाले आहेत. त्यानंतर, आलियाचा मेंटॉर आणि रणबीरचा खूप जवळचा मित्र असलेल्या करण जोहरनं सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाबद्दल भावना व्यक्त केल्या. आपल्या पोस्टमध्ये करणनं रणबीरला त्याचा जावई (Son-in-law) म्हटलं आहे. करण जोहरचा आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रच्या सेटवर रणबीर आणि आलिया प्रेमात पडले होते. आता त्यांनी पारंपरिक पंजाबी पद्धतीनं (Punjabi Wedding Ceremony) लग्नही केलं.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Karan Johar, Ranbir kapoor