कुठे निघाली रणबीर-आलियाची सवारी, सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

कुठे निघाली रणबीर-आलियाची सवारी, सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलिवूडमधील कलाकारांसोबत पंतप्रधानांच्या भेटीला जाताना एकत्र दिसले होते. आता पुन्हा एकदा दोघांचा विमानातील एक फोटो व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट रिलेशन शीपमुळे सतत चर्चेत असतात. अनेकदा ते दोघं एकत्र दिसत असल्यामुळे खऱ्या आयुष्यात ते कधी एकत्र येणार याबाबत त्यांच्या फॅन्सना चिंता लागली आहे. खऱ्या आयुष्यात नव्हे पण काही दिवसांत ते दोघंही 'ब्रम्हास्त्र' सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

रणबीर आणि आलिया ब्रम्हास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यग्र आहेत. चित्रपटाचं अर्ध शूटिंग पूर्ण झालं असून उर्वरित शूटिंग पूर्ण करण्यासाठी ते दोघंही दिल्लीला रवाना झाले आहेत. सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्याच्या निमित्तानं पून्हा एकदा ते दोघं एकत्र आले आहेत.

शूटिंगला जात असतानाचा रणबीर-आलियाचा विमानातील फोटो एका फॅनने इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात रणबीर कपूर पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये फार देखणा दिसत आहे तर आलियासुद्धा निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रणबीर आणि आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया, विक्रम गोखले अशा दिग्गज कलाकारांसोबत मौनी रॉय, प्रतिक बब्बर, दिव्यांदु शर्मा यांसारखे नवखे कलाकारही दिसतील. यंदाच्या ख्रिसमसला म्हणजेच 25 डिसेंबर 2019 रोजी 'ब्रम्हास्त्र' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
 

View this post on Instagram
 

💕


A post shared by Ranbir Kapoor 🔵 (@ranbir_kapoooor) on


काही दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीर बॉलिवूडमधील कलाकारांसोबत दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी करण जोहर, सिद्धार्थ मन्होत्रा, विक्की कौशल, एकता कपूर, रोहित शेट्टी, रणवीर सिंग आणि वरुण धवन हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 03:05 PM IST

ताज्या बातम्या