मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'साठी रणबीर आणि आलियाने किती घेतलंय मानधन? अयान मुखर्जीने स्पष्टच सांगितलं

Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'साठी रणबीर आणि आलियाने किती घेतलंय मानधन? अयान मुखर्जीने स्पष्टच सांगितलं

Brahmastra

Brahmastra

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या स्टर्सनी किती मानधन घेतलं असेल हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता याबाबत अयान मुखर्जीने मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 22 सप्टेंबर : अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि मल्टीस्टारर 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपटबॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे. या चित्रपटाची  प्रदर्शित होण्याआधीखूप चर्चा रंगली होती. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला सुरवातीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तसंच  या चित्रपटाला  बॉयकॉटची देखील भीती होती. 'ब्रह्मास्त्र' चित्रपट हिट झाला असं निर्मात्यांचं म्हणणं असलं तरी  या चित्रपटाच्या कमाईबद्दल अजून सगळे चित्र स्पष्ट झालेले नाही.  या चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक अयान मुखर्जी तब्बल 10 वर्ष मेहनत घेतली आहे. पण चित्रपटाच्या स्टर्सनी किती मानधन घेतलं असेल हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता याबाबत अयान मुखर्जीने मोठा खुलासा केला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडचा सगळ्यात महागडा चित्रपट आहे. चित्रपटाचे बजेट 400 कोटी नाही तर 650 कोटी आहे. एवढ्या मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचा दावा केला जात असला तरी काही लोक त्याचा साफ नकार देत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या वाढत्या VFX बिलामुळे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांची फी घेतली नाही अशी चर्चा सुरु आहे. आता  यावर अयान मुखर्जीने उत्तर देऊन सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हेही वाचा - Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर समंथा पुन्हा लग्न करण्यास तयार!; या गोष्टीमुळे चर्चांना उधाण चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला की, ‘या चित्रपटासाठी मी माझ्या आयुष्याची १० वर्ष दिली आहेत. गेल्या दहा वर्षात मी कोणतेच इतर काम केले नाही फक्त या चित्रपटाचा विचार करत होतो. रणबीरने या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही. हा चित्रपट आपल्या स्वतःच्या जिद्द आणि वैयक्तिक त्यागातून बनवला गेला आहे. रणबीर या चित्रपटात एक स्टार म्हणून नाही, ब्रह्मास्त्रच्या निर्मितीसाठी त्यांनी कोणतेही मानधन घेतले नाही. हे खरे आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण हा चित्रपट बनवणे त्याशिवाय शक्य झाले नसते.'
आलियाने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली तेव्हा ती स्टार नव्हती. आलिया भट्टबद्दल बोलताना अयान म्हणाला, 'जेव्हा ती या चित्रपटाचा भाग बनली, ते वर्ष 2014 होते, त्यावेळी तिचे मोजकेच चित्रपट प्रदर्शित झाले होते.  तेव्हा ती आताच्यासारखी मोठी स्टार नव्हती. या चित्रपटात आलियासाठी निश्चित केलेली रक्कम फारशी नव्हती. पण ती तुटपुंजी रक्कमही चित्रपट पूर्ण करायला गेली. दरम्यान,  'ब्रह्मास्त्र' चित्रपट  प्रदर्शित झाल्यानंतर उत्तम कमाई करण्यात यशस्वी झाला.  परंतु आता त्याचा वेग मंदावल्याचे दिसत आहे. गुरुवारी सुमारे 3.10 कोटी रुपये जमा करण्यात यश आले. रिपोर्टनुसार, देशभरात चित्रपटाचे एकूण कलेक्शन आतापर्यंत 230 कोटी रुपये झाले आहे.
First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Entertainment, Ranbir kapoor

पुढील बातम्या