व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर रणबीर आलियाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रणबीर आणि आलिया त्यांच्या अपार्टमेंटच्या मोकळ्या जागेत त्यांच्या डॉगीसोबत फिरताना दिसत आहेत. या व्हिडीओवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर आलियानं ब्रेकअप केल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू होत्या मात्र त्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत आलियानं सर्वांना सडेतोड उत्तर दिलं होतं. हा फोटो रणबीरनं क्लिक केला होता. 'रामायण'च्या पुनर्प्रक्षेपणावर TV अॅक्ट्रेस कविता कौशिकने केलं वादग्रस्त ट्वीट रणबीर आणि आलियाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर हे दोघंही लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहेत. ही रिअल लाइफ जोडी पहिल्यांद मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. याशिवाय या सिनेमात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. क्वारंटाईनमध्येही विरुष्काचा रोमान्स सुरू, विराटसाठी अनुष्का झाली हेअरस्टायलिस्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Ranbir kapoor