ठरलं ! 'या' महिन्यात रणबीर - आलिया अडकणार लग्नबंधनात
ठरलं ! 'या' महिन्यात रणबीर - आलिया अडकणार लग्नबंधनात
Alia Bhatt & Ranbir Kapoor
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt )आणि अभिनेता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघेही याच वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत
मुंबई, 7 फेब्रुवारी: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt )आणि अभिनेता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघेही याच वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघेही गेल्या वर्षी लग्न करणार होते पण, कोरोना महामारीमुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता हे दोघे एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे.
एक वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, आलिया रणबीर एप्रिल महिन्यात सात फेरे घेणार आहेत. कपूर आणि भट्ट या दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले आहे. दोघेही लग्नासाठी राजस्थानमधील रणथंबोरची निवड करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रणथंबोर हे दोघांच आवडतं ठिकाण आहे. अनेकवेळा दोघे या ठिकाणी स्पॉट झाले आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ या क्यूट कपलनेदेखील रणथंबोर ला पसंती दिली होती.
कुटुंबातील एका जवळच्या नातेवाइकाकडून दोघांच्या लग्नाबाबत माहिती विचारले असता, सुरुवातीला त्यांनी या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला, पण नंतर तयारी सुरु असण्याच्या अंदाज हा खर असल्याचे म्हटले आहे. आणि दोघांच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व आलिया भट (Alia Bhatt ) एकमेकांसोबत नात्यात आहेत, हे आताशा कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. अलीकडे ‘आरआरआर’च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये आलियाने जाहिरपणे याची कबुली दिली होती. होय, माझ्या आयुष्यात आणखी एक ‘आर’ आहे, असं ती म्हणाली होती. तिचा अर्थ रणबीर कपूरशी होता. रणबीर व आलिया हे बॉलिवूडचं पॉवर कपल लवकरच लग्न करणार आहे.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.