मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रिसेप्शन पार्टीतील Alia Bhatt-Ranbir Kapoor च्या स्माइलवर चाहते फिदा, समोर आला कपलचा पहिला Inside Photo

रिसेप्शन पार्टीतील Alia Bhatt-Ranbir Kapoor च्या स्माइलवर चाहते फिदा, समोर आला कपलचा पहिला Inside Photo

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाचे फोटो (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding photos) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नानंतर हे सुपरस्टार्स पुन्हा एकदा 16 एप्रिलच्या रात्री म्हणजेच शनिवारी 'वास्तू' अपार्टमेंटमध्ये रिसेप्शन पार्टीमध्ये दिसून आले

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 17 एप्रिल: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाचे फोटो (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding photos) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नानंतर हे सुपरस्टार्स पुन्हा एकदा 16 एप्रिलच्या रात्री म्हणजेच शनिवारी 'वास्तू' अपार्टमेंटमध्ये रिसेप्शन पार्टीमध्ये दिसून आले. बॉलिवूडचे या पॉवर कपलने एका शाही पोस्ट-वेडिंग पार्टीचे (Alia Bhtt-Ranbir Kapoor Wedding Reception) आयोजन केले होते, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स उपस्थित होते. लग्नाप्रमाणे ही पार्टी देखील जल्लोषात पार पडली, हे समोर आलेल्या फोटोंवरुन स्पष्ट होत आहे. पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींचे अनेक फोटो समोर आले आहेत, रणबीर-आलियाचा फोटो अद्याप समोर आला नव्हता. मात्र आता चाहत्यांना ही झलक देखील पाहायला मिळाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि रणबीर कपूरची बहीण करिश्मा (Karishma Kapoor Shared photo of Ranbir-Alia) कपूर हिने इन्स्टाग्रामवर हा नवविवाहित कपलसह खास फोटो शेअर केला आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा रिसेप्शन लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. लग्न आणि मेहंदीच्या फोटोंनंतर आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीतील मिस्टर आणि मिसेस कपूरचा पहिला फोटो समोर आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

हे वाचा-या आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO

आलिया-रणबीरच्या या पार्टीमध्ये कपूर-भट्ट कुटुबीयांसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली होती. पापाराझींनी त्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र करिश्मा कपूरने शेअर केलेला हा फोटो खास आहे. कारण यामध्ये रिसेप्शन पार्टीतील मिस्टर अँड मिसेस रणबीर कपूर यांची पहिली झलक पाहायला मिळते आहे. 'मिस्टर अँड मिसेस रणबीर कपूर यांना खूप सारं प्रेम', असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटो शेअर केला आहे. शिवाय तिने #aboutlastnight #merebhaikishaadihai असे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत. या फोटोमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. दोघांच्या स्माइलने चाहत्यांचे मन जिंकून घेतलं आहे.

रिसेप्शनच्या या फोटोमध्ये रणबीर काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. त्याचबरोबर आलिया शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे. या पार्टीत बहुतेक स्टार्स काळ्या रंगाच्या पोशाखात दिसले होते, त्यामुळे चाहत्यांचा असा अंदाज आहे की, पार्टीचा ड्रेस कोड थीम ब्लॅक ठेवण्यात आली होती.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Ranbir kapoor