मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranbir Alia Wedding : 76 वर्ष जुन्या RK HOUSE शी काय आहे आलिया-रणबीरच्या लग्नाचं कनेक्शन?

Ranbir Alia Wedding : 76 वर्ष जुन्या RK HOUSE शी काय आहे आलिया-रणबीरच्या लग्नाचं कनेक्शन?

 रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या(Alia Bhatt) लग्नाची सगळीकडं जोरदार चर्चा आहे. मात्र त्यांच्या लग्नाचं 76 वर्ष जुन्या RK HOUS शी खास कनेक्शन आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या(Alia Bhatt) लग्नाची सगळीकडं जोरदार चर्चा आहे. मात्र त्यांच्या लग्नाचं 76 वर्ष जुन्या RK HOUS शी खास कनेक्शन आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या(Alia Bhatt) लग्नाची सगळीकडं जोरदार चर्चा आहे. मात्र त्यांच्या लग्नाचं 76 वर्ष जुन्या RK HOUS शी खास कनेक्शन आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 13 एप्रिल- रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) आजच्या दिवशी 43 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करायला जात आहेत. आजच्या दिवशी ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू सिंग (Neetu Kapoor) यांनी साखरपुडा केला होता. यानंतर या दोघांनी 22 जानेवारी 1980 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांचे लग्न आरके बंगल्यात झाले होते. या बंगल्याचे नाव बदलून नंतर कृष्णा राज बंगला असं ठेवण्यात आलं. याच बंगल्यात आता रणबीर आणि आलिया लग्न (ranbir kapoor and alia bhatt wedding)  करणार असल्याची चर्चा आहे. सध्या सगळीकडे जरी रणबीर आणि आलियाच्या लग्नाची चर्चा असली तरी आज आपण या 76 वर्षापूर्वीच्या आरके हाऊसविषयी जाणून घेणार आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाची तयारी जवळ-जवळ झाली आहे. अशी चर्चा आहे की, या बंगल्यात ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. याच बंगल्यात ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू सिंग (Neetu Singh) यांनी लग्न घेतले होते. फक्त बंगल्यात ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाविषयीच नाही तर अशा बऱ्याच कपूर परिवारासंबंधीच्या आठवणी या घरांशी जोडल्या गेल्या आहेत.

76 वर्षापूर्वी राज यांनी पत्नी कृष्णासाठी आरके कॉटेज बांधलं

शोमॅन राज कपूर यांनी 76 वर्षापूर्वी पत्नी कृष्णा यांच्यासाठी आरके हाऊसचा पाया रचला होता. 1946 साली आरके स्टुजिओच्या पाठीमागे आरके कॉटेज बांधण्यात आलं. 3 हजार स्क्वेअर फूटाच्या या कॉटेजमध्ये राज कपूर त्यांच्या पत्नी कृष्णा आणि पाच मुलं रणधीर, ऋतु, ऋषी , राजीव, रीमा यांच्यासोबत राहत होते. कालांतराने सर्व भाऊ वेगळे राहू लागले. मात्र ऋषी कपूर नितू यांच्यासोबत याच बंगल्यात राहत होते.

वाचा- रिलेशनशीपमध्ये असताना प्रेग्नंट झाली, डायरेक्टरने दिलं सोडून: अभिनेत्रीचा खुलासा

ऋषी कपूर-नीतू सिंग यांच्यासोबत करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूरचं देखील लग्न याच बंगल्यात पडलं आहे पार

रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबीता यांचं लग्न देखील याच कॉटेजमध्ये झालं. 1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाच्यावेळी आरके कॉटेजचे नाव बदलून कृष्णा राज बंगला असं करण्यात आलं. मात्र असं जरी असलं तरी आजही काही लोक याला आरके हाऊस या नावानं ओळखतात. याच ठिकणी करिश्मा कपूर आणि रिद्धिमा कपूर या दोघींचं देखील लग्न झालं आहे.

वाचा-आलियाच्या लग्नात बहिणींची असणार हवा! बूट मिळविण्यासाठी रणबीर देणार इतकी रक्कम

30 कोटीमध्ये विकणार होती ऋषि कपूर हा बंगला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषी कपूर त्यांच्या पूर्वजांच्या या बंगल्याला विकणार होते. 30 कोटीला हा बंगला विकणार असल्याची चर्चा होती. मात्र ऋषी कपूर यांच्या या मताशी त्यांची आई आणि बहीण सहमत नव्हती. त्यांना ही गोष्ट आवडली नव्हती. त्यांना वाटतं होत की, या बंगल्याचं रूपांतर एका मोठ्या इमरातीत करावं. शेवटी 2016 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी BMC कडे बंगला पाडण्याची परवानगी मागितली आणि तेव्हापासून त्याचे काम सुरू आहे.

आरके हाऊसचं रूपांतर आता 15 मजली अपार्टमेंटमध्ये होणार

आरके हाऊसच्या ठिकाणी आता 15 मजली अपार्टमेंट बांधले जात असून, त्यात सुमारे 6 मजल्यांपर्यंत 45 वाहने पार्क करण्याची व्यस्था करण्यात येणार आहे. शिवाय 7 मजले हे राहण्यासाठी असणार आहेत. ज्यामध्ये लक्झरी अपार्टमेंट तयार केले जात आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor