समद्या गावाला झालिया लग्नाची घाई! रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL

आलिया आणि रणबीरचं वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ज्यात त्यांच्या लग्नाचा वेन्यू आणि तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 03:05 PM IST

समद्या गावाला झालिया लग्नाची घाई! रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL

मुंबई, 22 ऑक्टोबर : बॉलिवूड स्टार्सच्या खासगी आयुष्यावर त्यांच्या चाहत्यांची खास नजर असते. त्यातकरुन जर त्यांच्या लग्नाविषयी जराही काही हिंट मिळाली तर अनेक अफवा सुरू होतात. सध्या बॉलिवूडमध्ये असंच काहीसं चित्र आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत. हे दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असंही म्हटलं जात आहे. दरम्यान नुकतंच आलिया आणि रणबीरचं वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ज्यात त्यांच्या लग्नाचा वेन्यू आणि तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे.

सोशल मीडियावर आलिया भट आणि रणबीर कपूर यांचं वेडिंग कार्ड सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. या कार्डवर रणबीर आलियाच्या नावासह त्यांच्या लग्नाचं ठिकाण आणि तारीख यांचा उललेख केला आहे. मात्र या कार्डचं डिझाइन अतिशय वाईट प्रकारे करण्यात आलं आहे. या कार्डनुसार आलिया-रणबीर यांचं लग्न 22 जानेवारी 2020 ला जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये होणार असल्याचं लिहिलं आहे. पण हे कार्ड व्यवस्थित पाहिल्यास पूर्णपणे खोटं असल्याचं दिसून येतं.

'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' परिणीतीनं सांगितलेलं सत्य ऐकून बसेल धक्का!

या कार्डवर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची नावं आहेत. मात्र आलियाचे वडील महेश भट यांचं नाव चुकीचं लिहिण्यात आलं आहे. या कार्डवर महेश ऐवजी मुकेश असं लिहिलं आहे. म्हणजेच आलियाला मुकेश भट यांनी मुलगी म्हणण्यात आलं आहे. तसेच आलियाच्या नावाचं स्पेलिंग सुद्धा चुकीचं लिहिण्यात आलं आहे. तर लग्नाची तारीख 22nd ऐवजी 22th अशी लिहिण्यात आली आहे.

Loading...

SEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...

आलिया भट आणि रणबीर कपूर मागच्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सोनम कपूरच्या लग्नाच्यावेळी या दोघांनीही आपलं नातं ऑफिशिअल केलं होतं. त्यानंतर एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियानं सर्वांसमोर रणबीरला I Love You म्हणत प्रेमाची जाहीर कबुली सुद्धा दिली होती. त्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा जोरावर होत्या. मात्र या दोघांनी अद्याप आपल्या लग्नाचं कोणतंही कन्फर्मेशन दिलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे वेडिंग कार्ड खोट असल्याचं स्पष्ट होतं.

मतदान केंद्रावर अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन, वाचा नक्की काय झालं

=====================================================

VIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 03:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...