मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranbir alia daughter name: रणबीर आलियानं केलं लेकीचं बारसं; दाखवली लेकीची पहिली झलक

Ranbir alia daughter name: रणबीर आलियानं केलं लेकीचं बारसं; दाखवली लेकीची पहिली झलक

आलिया भट्ट-रणबीर कपूर

आलिया भट्ट-रणबीर कपूर

आलिया रणबीर यांच्या मुलीचं नावं समोर आलं आहे. कपूर घरातील नातीच्या नावाचा अर्थ खूपच सुंदर आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 24 नोव्हेंबर : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काही दिवसांआधीच आई बाबा झाले. आलियानं गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी मुलीचं बारसं केलं असून कपूर घराण्यातील नातीचं नाव समोर आलं आहे. गेली अनेक दिवस आलिया आणि रणबीर यांच्या मुलीचं नाव काय असणार यावर चर्चा सुरू होती. अनेकांनी सोशल मीडियावर अनेक नावं सुचवली होती.  पण अखेर लेकीचं बारसं करून राहा कपूर असं कपूर घरातील नातीचं नाव समोर आलं आहे.  आलिया रणबीरच्या लेकीचं नाव हे आजी नीतू कपूर यांनी ठेवलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी मुलीचं नावं सांगितलं आहे. आलिया आणि रणबीरनं मुलीचं नाव राहा आसं ठेवलं आहे.

आलियानं लेकीचं नाव सांगत खास पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं लेकीच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. वेगवेगळ्या भाषेत राहा या नावाचा सुंदर अर्थ तिनं लिहिला आहे.  आलियानं म्हटलंय, नाव राहा. हे तिच्या समजदार आणि सुंदर आजीनं ठेवलं आहे.  या नावाचे खूप सुंदर अर्थ आहेत. राहाचा खरा अर्थ दिव्य रस्ता. स्वाहिलीमध्ये राहाचा अर्थ जॉय ( खुशी). तर संस्कृतमध्ये याचा अर्थ वंश. बंगाली भाषेत आराम, कंम्फर्ट आणि रिलीफ. तर अरेबिकमध्ये राहाचा अर्थ शांती. राहा म्हणजे खुशी, आझादी आणि आशिर्वाद. जेव्हा तिला पहिल्यांदा कुशीत घेतलं तेव्हा मी सगळं मला जाणवलं. आमच्या आयुष्यात आणि कुटुंबात येण्यासाठी तुझे खूप आभार. तुझ्या येण्यानं असं वाटतं आहे की आमचं आयुष्य आता खऱ्या अर्थानं सुरू झालं आहे.

6 नोव्हेंबरला राहाचा जन्म झाला. आलिया आणि रणबीर लेकीच्या जन्मानंतर खूप खुश आहेत. रणबीरनं तर सुट्टी घेतली असून आलिया आणि राहाची काळजी घेण्यात तो बिझी आहे.  आलियानं संध्या कामातून घेतला आहे. दोघेही त्यांचं पॅरेंटहुड एन्जॉय करत आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News