मुंबई, 23 फेब्रुवारी: बॉलिवूडचे लवबर्ड्स रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या अनेक ठिकाणी एकत्र दिसत असल्याने रणबीर आणि आलियाच्या लग्नाची पुन्हा (Ranbir-Alia Marriage) एकदा चर्चा आहे. दोघंही एकमेकांच्या कुटुंबासोबत अनेकदा पाहायला मिळाल्यानेवत्यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यातच रणबीर कपूरची आई नीतू कपूर (Neetu kapoor) आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahani) प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या घराबाहेर दिसल्या आहेत. त्यामुळे रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घराबाहेर रिद्धिमा कपूर साहनी आणि नीतू कपूर दिसल्या. या दोघींना मनिष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी दोघींनी फोटोग्राफरसाठी पोजही दिली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर यांचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्याने एक मजेदार कॅप्शनही लिहिलं आहे. त्याने लिहिलं की, 'आमच्या मनात फक्त दोनच गोष्टी येतात, एक म्हणजे बाळ आणि दुसरं म्हणजे लग्न. ज्यावेळी आम्ही लोकांना डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी किंवा दुकानात पाहतो. तेव्हा त्यांच्याकडे संशयास्पदपणे का पाहतो.'