मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding: लग्नाआधी रणबीरच्या घरीच होणार 'बॅचलर्स पार्टी', हे स्टार्स लावणार हजेरी?

Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding: लग्नाआधी रणबीरच्या घरीच होणार 'बॅचलर्स पार्टी', हे स्टार्स लावणार हजेरी?

रणबीर आणि आलिया हे एप्रिलच्या मध्यापर्यंत लग्नबंधनात (Ranbir Alia wedding date) अडकू शकतात. या दोघांचे कुटुंबीयही सध्या लग्नाच्या तयारीतच व्यग्र असल्याचे दिसून येत आहे.

रणबीर आणि आलिया हे एप्रिलच्या मध्यापर्यंत लग्नबंधनात (Ranbir Alia wedding date) अडकू शकतात. या दोघांचे कुटुंबीयही सध्या लग्नाच्या तयारीतच व्यग्र असल्याचे दिसून येत आहे.

रणबीर आणि आलिया हे एप्रिलच्या मध्यापर्यंत लग्नबंधनात (Ranbir Alia wedding date) अडकू शकतात. या दोघांचे कुटुंबीयही सध्या लग्नाच्या तयारीतच व्यग्र असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई,  05 एप्रिल: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांच्या रिलेशनशिपबाबत आता जवळपास सर्वांनाच माहिती झालं आहे. हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर होत राहतात. रणबीर कपूरला खरं तर आपल्या रिलेशनशिपबाबत (Ranbir Kapoor Relationships) जास्त बोलायला आवडत नाही. तो इतर बॉलिवूड स्टार्सप्रमाणे सोशल मीडियावरही कमीच दिसतो. मात्र तरीही त्याच्या रिलेशनशिपबद्दल बऱ्याच गोष्टी माध्यमांमध्ये चर्चेत असतात. सध्या रणबीरच्या लग्नासोबतच, त्यापूर्वीच्या बॅचलर पार्टीची (Ranbir Kapoor Bachelor’s Party) चर्चा माध्यमांमध्ये आणि रणबीरच्या फॅन्समध्ये सुरू आहे.

रणबीरचे जवळचे मित्र येणार पार्टीत

रणबीरच्या जवळच्या एका सूत्राने आज तकला दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी आपल्या खास मित्रांना रणबीर बॅचलर्स पार्टी देणार आहे. या पार्टीमध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor), अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर असे सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. यासोबतच, रणबीरचे लहानपणीचे मित्रही (Ranbir Kapoor friends) या पार्टीला हजर राहण्याची शक्यता आहे. ही पार्टी रणबीरच्या घरीच होणार असल्याचेही म्हटले जात आहे.

हे वाचा- Sunny Leone ने खरेदी केलं स्वप्नातलं घर, ते देखील मुंबईत! Shocking आहे किंमत

एप्रिलच्या मध्यापर्यंत होईल लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलिया हे एप्रिलच्या मध्यापर्यंत लग्नबंधनात (Ranbir Alia wedding date) अडकू शकतात. या दोघांचे कुटुंबीयही सध्या लग्नाच्या तयारीतच व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. दोघेही माध्यमांसमोर आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यात कचरत नाहीत. तसंच, आलिया कित्येक वेळा रणबीरच्या कुटुंबीयांसोबत (Alia Bhatt with Kapoor family) दिसली आहे. रणबीर सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसला, तरी आलियाच्या इन्स्टाग्राम (Alia Bhatt Instagram) आणि इतर सोशल मीडिया अकाउंट्सवर तिचे रणबीरच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो दिसतात.

हे वाचा-माधुरी दीक्षित ते विकी-कतरिना... कोट्यवधी कमावूनही भाड्याच्या घरात राहतात हे बॉलिवूड सुपरस्टार्स!

लग्नानंतर आलिया जाणार अमेरिकेला?

असं म्हटलं जात आहे, की लग्नानंतर आलिया थेट अमेरिकेला रवाना होणार आहे. आलियाने नुकताच एक हॉलिवूडची मूव्ही (Alia Bhatt Hollywood Movie) साईन केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart of Stone) हा तिचा पहिलाच हॉलिवूडपट असणार आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार जोडी

रणबीर आणि आलिया ही जोडी ब्रह्मास्त्र (Brahmastra movie) या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहे. सध्या लग्नाच्या तयारीसोबतच हे दोघे ब्रह्मास्त्रच्या पब्लिसिटीमध्येही बिझी आहेत. ब्रह्मास्त्र ही एक सुपरहीरो फ्रँचायजी असणार आहे. याचा पहिला भाग या वर्षी सप्टेंबरमध्ये (Brahmastra movie release date) प्रदर्शित होणार आहे. या दोघांच्या लग्नाची जेवढी उत्सुकता यांच्या फॅन्सना आहे, तेवढीच उत्सुकता या चित्रपटाबद्दलही आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Ranbir kapoor, Wedding