मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Brahmastra Trailer Date Out: ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर येणार या दिवशी, विशाखापट्टणम दौऱ्यात टीमने केली grand announcement!

Brahmastra Trailer Date Out: ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर येणार या दिवशी, विशाखापट्टणम दौऱ्यात टीमने केली grand announcement!

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) इन्स्टाग्रामवर फारसा ऍक्टिव्ह नसला तरी त्याच्याबद्दलचे अपडेट्स काही लपून राहत नाहीत. रणबीर आणि त्याची बायको आलिया भट्ट (Ranbir Kapoor Alia Bhatt) 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाबद्दलची ही grand न्यूज ऐकलीत का? (Brahmastra movie news)

पुढे वाचा ...
  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 31 मे: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor and Alia Bhatt) या क्युट कपिलची चर्चा तर सगळीकडे सतत होत असते. पण आज त्यांच्या क्युटनेस पेक्षाही जास्त एका खास गोष्टीमुळे त्यांच्याबद्दल बरीच चर्चा होत आहे.'ब्रह्मास्त्र' (Brahmastra movie) या बिग बजेट चित्रपटाची चर्चा गेले अनेक वर्ष सुरु आहे. या चित्रपटाचे एक एक पैलू आता उलगडू लागले आहेत आणि शेवटी हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. तब्ब्ल 100 दिवसांआधीपासून 'ब्रम्हास्त्र' च्या प्रमोशनसाठी टीमचा लगे रहो होताना दिसत आहे. या चित्रपटाशी निगडित एक मोठी बातमीसुद्धा समोर आली आहे.

आज रणबीर कपूर थेट विशाखापट्टणमला जाऊन पोहोचला आहे. तब्ब्ल 100 दिवस आधीपासूनच त्याच्या बहुचर्चित बिग बजेट चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आणि साऊथ इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा अर्थात दिग्दर्शक एस एस राजामौली (S S Rajamouli)यांच्यासोबत रणबीर वायझॅगच्या फॅन्सना भेटायला आला आहे. विशाखापट्टणममध्ये त्यांचं फुलांचा वर्षाव करून तिघांचं जंगी स्वागत करण्यात आलं. एवढंच नाही तर क्रेनने भलामोठा पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. फिल्म प्रमोशन एवढंच या दौऱ्याचं कारण नसून एका विशेष कारणासाठी हा दौरा आखण्यात आला आहे.

काय आहे ही ग्रँड न्यूज?

या दौऱ्याच्या माध्यमातून ब्रह्मास्त्रच्या टीमने एक खूप मोठी घोषणा केली आहे. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा ट्रेलर येत्या 15 जूनला (Brahmastra Trailer out on 15th June) सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल ब्रह्मास्त्रच्या स्टारकास्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट सुद्धा शेअर केल्या आहेत. "केवळ 100 दिवसात हा चित्रपट तुमचा होणार आहे. पण त्या आधी 15 जूनला येणारा ट्रेलर बघायला विसरू नका" अशी पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे.

ब्रम्हास्त्र या बिग बजेट चित्रपटाची स्टारकास्ट सुद्धा तगडी आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबत महानायक अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन अशी बडी नावं या चित्रपटाचा भाग आहेत. आपसूकच या नावांमुळे आणि ब्रम्हास्त्रच्या तुफान पोस्टमुळे नक्कीच चित्रपट भव्यदिव्य असणार याबद्दल शंका नाही.

आजच्या दौऱ्याआधी विशाखापट्टणमला निघत असताना रणबीर कपूरचे अनेक फोटो व्हायरल होत होते. त्याच्या लुकची आणि एकूणच त्याच्या व्यक्तिमत्त्वाची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

चाळीशीच्या उंबरठयावर असलेला रणबीर आजही त्याचं तारुण्य टिकवून आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये असलेलं त्याच्याबद्दलचं वेड यावर बोलायलाच नको. त्याची बायको आलिया भट्ट सुद्धा त्याची एक फॅन झाली असून तिने खास रणबीर कपूरच्या लुकची स्टोरी शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

आलिया आणि रणबीरने एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली होती. त्यांचं लग्न एकूणच मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता.

हे ही वाचा-माधुरी, दिशानंतर आता मलायकाचा व्हिडीओ VIRAL, काय आहे नेमकं चॅलेंज?

त्यांच्या लग्नाचे छोटे छोटे डिटेल्स समजून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक होते. हे नवविवाहित दाम्पत्य आपलं प्रेम दाखवायला विसरत नाही.या ग्रँड आणि हाय बजेट फिल्मकडून सगळ्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. हा या चित्रपटाचा पहिला भाग असणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Ranbir kapoor