S M L

रणबीरनं आलियासोबतच्या नात्याबद्दल नक्की काय सांगितलं?

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या प्रेमाची चर्चा खूप आहे. दोघांचे फोटोही व्हायरल झालेत.

Updated On: Aug 23, 2018 11:32 AM IST

रणबीरनं आलियासोबतच्या नात्याबद्दल नक्की काय सांगितलं?

मुंबई, 23 आॅगस्ट : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या प्रेमाची चर्चा खूप आहे. दोघांचे फोटोही व्हायरल झालेत. अगदी रणबीर आणि आलिया महेश भट्टना भेटले इथपासून ऋषी कपूरनं आलियाबद्दल चांगलं म्हटलं, इथपर्यंत सगळेच विषय चर्चिले गेले. सेलिब्रिटींच्या लग्नाच्या मोसमात रसिकांनी रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख काय यावरही चर्चा केली.पण एक धक्कादायक बातमी समोर येतेय. रणबीर कपूरंच यावर खुलासा केलाय.

रणबीर म्हणाला, ' आलिया आणि माझ्या अफेअरची जी चर्चा आहे, त्यात काही तथ्य नाही. तो एक शो बिझनेस आहे. लोक आज एक कहाणी रचतात, उद्या दुसरी.'

रणबीरनं लग्न कधी करायचं यावरही गंभीरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, ' जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता, एकमेकांबरोबर आयुष्य घालवावं असं वाटतं तेव्हा लग्न करायचं. माझ्या आयुष्यात तरी अजून कुणी नाहीय. मी 35 वर्षांचा झालो, म्हणून आता लग्न करायला हवं, असं अजिबातच नाहीय. ते सहज व्हायला हवं.'

हेही वाचा

कृती सनाॅनचे ठुमके पाहायचेत? मग आओ कभी हवेली पे

Loading...

VIDEO - केरला केरला डोंट वरी केरला, रेहमानच्या सुरांनी दिला धीर

बिग बाॅस हिंदीच्या नव्या सिझनमध्ये मिलिंद सोमण आणि अंकिता, सूत्रांची माहिती

रणबीर म्हणतो, सध्या तो आयुष्य एंजाॅय करतोय. लोकांना त्याच्याबद्दल जे काही बोलायचंय ते बोलू दे.

प्रेमाविषयी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा तो काही अद्भूत काम करतो. प्रेमात असणं ही स्वत:मधेच एक सुंदर गोष्ट आहे.

आपल्या आणि आलियाविषयी बोलताना रणबीरने हा खुलासाही केला की, आम्ही दोघेही प्राणीप्रेमी आहेत. बऱ्याचदा या दोघांना आपापल्या पाळीव प्राण्यांसोबत फोटो शेयर करताना पाहिलं गेलं आहे.

रणबीरचा संजू सिनेमा सुपरडुपर हिट झाला. तो आणि आलिया ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र असणार आहेत. सोबत बिग बीही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 11:32 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close