News18 Lokmat

रणबीरच्या प्रेमात बुडालीय आलिया, फोटोतून समोर आली जवळीक

नुकतीच आलियानं इन्स्ट्राग्रावर रणबीरसोबतचा फोटो टाकलाय. त्यात आलिया एकटक रणबीरकडे पाहतेय.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2018 11:07 AM IST

रणबीरच्या प्रेमात बुडालीय आलिया, फोटोतून समोर आली जवळीक

मुंबई, 11 सप्टेंबर : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपबद्दल बरीच चर्चा झाली. तशी ती अजूनही सुरू आहे. अनेकदा ऋषी कपूरनं हे नातं स्वीकारल्याचे संकेतही दिलेत. आलियाही अनेकदा इन्स्ट्राग्रामवर रणबीरबरोबरचे फोटो पोस्ट केलेत.

नुकतीच आलियानं इन्स्ट्राग्रावर रणबीरसोबतचा फोटो टाकलाय. त्यात आलिया एकटक रणबीरकडे पाहतेय. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीय, असं त्या फोटोवरून दिसतं. त्यांच्या सोबत 'ब्रम्हास्त्र'चा अयान मुखर्जीही आहे. ब्रम्हास्त्र सिनेमामुळे दोघंही एकत्र आले. आणि त्यांची जवळीक जास्त वाढली.

 

Loading...

View this post on Instagram

 

It means no worries, for the rest of your dayssss...hakuna matata 🌞💃

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

रणबीरनं या शोमध्ये करणला विचारलं, 'जर तुम्ही तुमच्या पहिल्या रिलेशनशिपमध्ये एक चूक करता आणि तीच चूक पुन्हा तुम्ही दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये देखील करता तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे ?'

यावर करणनं ताबडतोब उत्तर दिलं, 'तुम्ही त्या नात्यातून लगेच बाहेर पडायला पाहिजे. तुम्ही एकच चूक नेहमी करत असाल, तर तुमच्यात काही कमतरता आहे. तेव्हा वेळीच सावध व्हायला हवं.'

त्यानंतर रणबीरनं विचारलं, ' तू माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील?' यावर करण म्हणाला, 'तू जगातला सर्वात बेस्ट नवरा आहेस. आणि हा सल्ला मी तुझ्या गर्लफ्रेंडला कधीच दिलाय.'

म्हणजे हे नक्की की रणबीरला गर्लफ्रेंड आहे आणि आलियाशिवाय ती दुसरी कोणी असणं शक्य नाहीय. त्यामुळे करणनं आधीच हा सल्ला देऊन टाकलाय तर!

आता पहिल्यांदाच एका मॅगेझीनसाठी रणबीर-आलियानं फोटोशूट केलंय. हे दोघेही अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र काम करत असले तरीही एकत्र फोटोशूट करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्यांचा हा लूक पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असणार हे काही वेगळं सांगायला नको.

मध्यंतरी प्रेमाविषयी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा तो काही अद्भूत काम करतो. प्रेमात असणं ही स्वत:मधेच एक सुंदर गोष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 11:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...