सेलिब्रेशन तो बनता हैं... आलियाने 'त्याच्या'साठी ठेवली खास पार्टी

सेलिब्रेशन तो बनता हैं... आलियाने 'त्याच्या'साठी ठेवली खास पार्टी

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी सहकुटुंब सहपरिवार ख्रिसमस पार्टीचा आनंद घेतला.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर: ख्रिसमसनिमित्त सगळ्याच सेलिब्रिटींच्या घरी जोरदार पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत आहे. ख्रिसमसचा दिवस जरी संपला असला तरी ख्रिसमसचा माहोल कायम आहे. नाताळनिमित्त अनेक सेलिब्रिटी आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत एकत्र एन्जॉय करताना दिसले. मग यात बॉलिवूडचं सगळ्यात हॉट कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) कसे मागे राहतील?

आलिया आणि रणबीरनेदेखील मौके पे चौका साधत सगळ्या कुटुंबासोबत पार्टीचा आनंद लुटला. दरवर्षीप्रमाणे, शशी कपूर यांच्या मुलाने अर्थात कुणाल कपूरने त्याच्या घरी ख्रिसमस लंचचं आयोजन केलं होतं. जुहू येथे कपूर कुटुंबाची जोरदार पार्टी झाली.

आलिया भट्टनेही तिच्या घरी खास डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. आलिया भट्टच्या डिनर पार्टीला संपूर्ण कपूर फॅमिली उपस्थित होती. या पार्टीला नितू कपूर, रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर एवढंच काय तर खुद्द करीना कपूरही सैफ अली खानसोबत हजर होती. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

नुकत्याच रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. रणबीरचं म्हणणं होतं की, कोरोना नसता तर मी याच वर्षी आलियाशी लग्न केलं असतं. तर आलिया भट्टचं म्हणणं होतं की मी लग्नासाठी अजून लहान आहे. एवढ्यात तरी माझा लग्नाचा विचार नाही.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, रणबीर कपूर आणि आलिया पहिल्यांदाच ब्रह्मास्त्र सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचाही महत्वाचा रोल या चित्रपटात आहे. शिवाय आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी या सिनेमातही झळकणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 26, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या