मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sumit Patil: भाडिपा स्टारने केला कहर, केसरिया गाण्याला कशा पद्धतीने सुधारलं पाहा VIDEO

Sumit Patil: भाडिपा स्टारने केला कहर, केसरिया गाण्याला कशा पद्धतीने सुधारलं पाहा VIDEO

सध्या इंटरनेटवर ट्रेंड होणार विषय म्हणजे केसरिया गाण्याचे लिरिक्स. रणबीर आलियाच्या नव्या रोमँटिक गाण्यातले काही शब्द चाहत्यांना खटकले असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे. पण यावर सोल्युशन काढत भाडिपा स्टारने कहर केल्याचं समोर येत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 20 जुलै: रणबीर आलियाचं नवं गाणं केसरिया (kesariya song) सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याने अगदी मोजक्या दिवसात रेकॉर्डब्रेक कामगिरी करत चाहत्यांना वेड लावलं आहे. पण या गाण्याला एवढं डोक्यावर घेतलं जात आहे याच कारण ठरलं आहे या गाण्याच्या काही ओळी. (love storiya in kesariya song) या गाण्यात अचानक येणारा ‘लव्ह स्टोरीया’ हा शब्द चाहत्यांना एवढा खटकला की त्यानंतर मिम्सचा पाऊसच पडू लागला. या गाण्याच्या ओळी बदल अशीही मागणी केली जात आहे. आता या प्रकरणात भाडिपा स्टार सुमित पाटीलने उतरत एक नवा ट्विस्ट गाण्याला देण्याचा भन्नाट प्रयत्न केला आहे. भाडिपाचे स्टार हे कायमच काहीतरी भन्नाट गोष्टी करताना दिसत असतात. सध्या केसरिया गाण्याचे लिरिक्स बदलावे म्हणून अनेक influencer वेगवेगळे व्हिडिओ बनवताना आणि या वाहत्या गंगेत आपला कन्टेन्ट तयार करून हात धुवून घेताना दिसत आहेत. यामध्ये या भाडिपा स्टारने सुद्धा उडी मारून जोरदार षटकार मारल्याचं समोर येत आहे. रणबीर कपूरच्या आयकॉनिक सिनेमा ‘यह जवानी है दिवाणी’ मधील एक सीन घेऊन सुमितने सगळ्याच चाहत्यांचं दुःख मांडलं आहे. तीन महिन्यांपूर्वी या गाण्याचा टिझर समोर आला होता ज्याने चाहत्यांच्या अपेक्षा बऱ्याच उंचावल्या होत्या. पण त्यानंतर आलेल्या गाण्याने काहीसा भ्रमनिरास झाल्याची प्रतिक्रिया अचूक आणि धमाल विनोदी पद्धतीने सुमितने मांडली आहे. एवढंच नाही तर या गाण्याच्या ओळी बदलून त्या जागी चंद्रा गाण्याच्या ओळी टाकत त्याने गाण्याचा पार बाजचं बदलून टाकला आहे. अचानक अरिजित सिंगच्या आवाजांनंतर येणारं चंद्रा हे गाणं ऐकून भल्याभल्यांना हसू रोखणं कठीण जात आहे.
  एवढंच नाही तर सुमितच्या या व्हिडिओवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करून त्याचा या अफलातून व्हिडिओला सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. स्वतः चंद्रमुखी अर्थात अमृता खानविलकर सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक सगळ्यांनी या व्हिडिओवर भरभरून प्रतिसाद देत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुमितने याआधी चंद्रमुखी सिनेमासाठी सुद्धा असाच एक तुफान विनोदी व्हिडिओ तयार केला होता. सुमित असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या चाहत्यांची असणारी इच्छा पूर्ण करून त्याने केसरिया गाण्याला दिलेला हा भन्नाट ट्विस्ट पसंत केला जात आहे आणि त्याच्या या कल्पनाशक्तीचं कौतुक होत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Alia Bhatt, Funny video, Marathi entertainment, Ranbir kapoor

  पुढील बातम्या