रणबीर-आलियाचं लग्न पुढच्या वर्षी?

रणबीर-आलियाचं लग्न पुढच्या वर्षी?

आता रणबीरनं आणखी एक फोटो शेअर केलाय. त्यात आलिया कुटुंबातली एक असल्यासारखी वाटते.

  • Share this:

मुंबई, 25 आॅक्टोबर : दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तारीख ठरली, तसे सगळ्यांच्या नजरा वळल्या रणबीर कपूर आणि आलियाकडे. आलिया शूटिंग संपल्यावर रणबीरला भेटायला न्यूयाॅर्कला पोचली आणि तिथे शाॅपिंगचे दोघांचे फोटो व्हायरल झाले.

आता रणबीरनं आणखी एक फोटो शेअर केलाय. त्यात आलिया कुटुंबातली एक असल्यासारखी वाटते. सोबत नितू कपूर आणि ऋषी कपूरही आहेत.  त्यामुळे आता पुढच्या वर्षी कपूर आणि भट्ट कुटुंबात लग्नाचे  चौघडे वाजणार असं दिसतंय.

 

View this post on Instagram

 

New York Nights !😍❤ . . . . . . . . . . . . . . #RanbirKapoor #Ranbir #RanbirKapoorFan #RanbirKapoorLove #RishiKapoor #NeetuKapoor #NeetuSingh #AliaBhatt #AliaaBhatt #NewYork #PicOfTheDay #Bollywood

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirfanbase) on

मध्यंतरी, 'नितूला आवडते, मला आवडते, रणबीरला आवडते, समजलं?' काही दिवसांपूर्वी ऋषी कपूरनं म्हटलं होतं. त्यानंतर सोनी राझदानसाठी रणबीर हा 'लव्हली लव्हली बाॅय' आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना आलिया-रणबीरबद्दल जी चर्चा  किंवा अफवा आहे त्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, 'मी माझ्या मुलीशी थेट बोलू शकते.'

त्या पुढे म्हणाल्या, ' माझं आणि माझ्या मुलीचं नातं खूपच चांगलं आहे. मला अफवांकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी थेट बोलू शकते. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे मला माहीत असतं. शेवटी ते तिचं जीवन आहे. तिला हवं तसं जगू द्यायला हवं. तिचे निर्णय ती स्वत: घेते.'

काही दिवसांपूर्वी रणबीरनं लग्न कधी करायचं यावरही गंभीरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, ' जेव्हा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडता, एकमेकांबरोबर आयुष्य घालवावं असं वाटतं तेव्हा लग्न करायचं. माझ्या आयुष्यात तरी अजून कुणी नाहीय. मी 35 वर्षांचा झालो, म्हणून आता लग्न करायला हवं, असं अजिबातच नाहीय. ते सहज व्हायला हवं.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2018 09:36 AM IST

ताज्या बातम्या