रणबीरची नवी 'गर्लफ्रेंड'

रणबीर तिच्याशी तासंतास फोनवरही बोलत असतो. एवढंच काय तर त्यानं तिची कतरिनाशी भेटही घालून दिली. आणि कतरिना बाईंना ती काही फार आवडली नाही.

Sonali Deshpande | Updated On: Jul 7, 2017 12:38 PM IST

रणबीरची नवी 'गर्लफ्रेंड'

 

07जुलै : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरच्या अफेयरच्या चर्चा थांबता थांबत नाहीयेत. कतरिनाशी ब्रेकअप झाल्यानंतर आता रणबीरला नवीन गर्लफ्रेंड मिळाल्याचं कळतंय.

या मुलीचं नाव काही अजून कळलेलं नाही. पण ही मुलगी एक मुंबई गर्ल असल्याचं कळतंय.रणबीर हिच्यासोबत खूप टाइम स्पेन्ड करत असल्याचंही कळंतय.इतकंच नाही तर ती सोबत नसताना रणबीर तिच्याशी तासंतास फोनवरही बोलत असतो. एवढंच काय तर त्यानं तिची कतरिनाशी भेटही घालून दिली. आणि कतरिना बाईंना ती काही फार आवडली नाही.

सूत्रांकडून असंही कळतंय की रणबीरला खरं तर अशी कुठलीच गर्लफ्रेंड नाहीय.  हे सारं तो कतरिनाला दाखवण्यासाठी करतोय. कतरिनाही तिला या गोष्टीचा काही फरक पडत नसल्याचं भासवतेय.पण तिच्या चेहऱ्यावरची निराशा आणि फ्रस्ट्रेशन काहीतरी वेगळंच सांगत आहेत.

रणबीर आणि कतरिनाचा 2016साली ब्रेकअप झाला होता . यावर्षी ब्रेकअपनंतर 'जग्गा जासूस' या सिनेमासाठी ते परत एकत्र आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2017 12:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close