राणादा-पाठकबाईंच्या लाडूसमोर आता नवं आव्हान

राणादा आणि पाठकबाईंचा लाडू एकदम लाडका. लहान वयात तो कुस्ती जिंकतो. पण त्याला आता नवं आव्हान मिळालंय.

  • Share this:

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतली राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत.

मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की एकीकडे राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे तर दुसरीकडे छोटा पैलवान लाडूने कुस्तीचा आखाडा गाजवला.

लाडू कुस्ती जिंकून अख्ख्या गावाची शान वाढवतो. स्वतः प्रतापराव लाडूच्या सत्कार समारंभाला हजर राहतात.

त्याच्या पहिल्या कुस्तीच्या विजयानंतर शेजारील गावातील एक इसम लाडूसाठी अजून एका कुस्तीचं आव्हान घेऊन येतो, पण यावेळी ही कुस्ती तारा नावाच्या मुलीसोबत असणार आहे.

नाना यांची मुलगी तारा ही देखील एक कुस्तीपटू असून नाना तिच्या तोडीच्या कुस्तीपटूसोबत तिच्या सामना करायचा ठरवतात आणि लाड़ूशिवाय तिला कोणी टक्कर देऊ शकत नाही असं नानांना वाटतंय.

राणादा आणि  अंजली लाडूला कुस्तीसाठी कसं तयार करतात, हे पाहणं रंजक ठरणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 05:29 PM IST

ताज्या बातम्या