हाऊसफुल-4 मध्ये आता नानाच्या जागेवर कोण?

हाऊसफुल-4 मध्ये आता नानाच्या जागेवर कोण?

तनुश्री दत्ताने लैंगिक छळाचा आरोप केल्यानं नाना पाटेकर सध्या सिनेमापासून लांब आहेत. आता मात्र निर्मात्यांनी चित्रपटातून नानांना हटवलं आहे आणि नानांच्या भूमिकेसाठी एका तरुण कलाकाराची निवड करण्यात आली असल्याचं समजतं. कोण घेणार नानाची जागा?

  • Share this:

मुबई, २२ ऑक्टोबर : साजिद नाडियादवालाच्या हाऊसफुल-4 मधून नाना पाटेकरांना हटवण्यात आलं आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपात सध्या नाना पाटेकर आहेत. त्यामुळे नाना या सिनेमापासून लांब राहत होते. आता मात्र निर्मात्यांनी चित्रपटातून नानांना हटवून त्या भूमिकेसाठी एका तरुण कलाकाराची निवड करण्यात आली आहे. साऊथचा सुपरस्टार राणा दग्गुबाती हा नानांच्या बदल्यात सिनेमात दिसणार आहे. अभिनेता राणाला बाहुबलीमधून भल्लालदेवच्या भूमिकेत सर्वांनी पाहिलं आहे. बॉलिवूडमध्ये राणाने बेबी, द गाझी अटॅक, यह जवानी है दिवानी यांसारखे सिनेमे केले आहेत आणि आता एका नवीन सिनेमात तो झळकणार आहे. नानांवर झालेल्या आरोपांनंतर सिनेमात त्यांच्या रिप्लेसमेंटची बातमी पसरत होती आणि अखेर निर्मात्यांनी नानांच्या बदल्यात राणाला चित्रपटात घ्यायचे ठरवले आहे.

राणा दग्गुबातीला सिनेमात घेतल्याने निर्मात्यांना फायदा होणार आहे. हाऊसफुल-4 ची चर्चा सर्वत्र असली तरी साऊथचा प्रेक्षकवर्ग बॉलिवूड सिनेमाकडे कमी आकर्षित होतो. राणाचा दाक्षिणात्य फॅन वर्ग मोठा आहे. राणाच्या येण्यानं साऊथचा प्रेक्षकही सिनेमा पहायला येण्याची शक्यता आहे.

हाऊसफुल-4 ओळख म्हणजेच सिनेमाची असलेली कास्टींग होय. हाऊसफूल सिनेमाचा आत्मा असलेले अक्षयकुमार, रीतेश देशमुख आणि बोमन इरानी हे चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेतच. पण दरवेळीसारखं सिनेमातील अभिनेत्री बदलण्यात आल्या आहेत. या सिक्वेलमध्ये क्रिती सेनन, क्रिती खारबांडा या दोघी दिसणार आहेत. तसेच बऱ्याच वर्षांनंतर रेस-3 मध्ये झळकलेला बॉबी देओल आणि मोहेंजो दरो सिनेमातून नायिकेच्या भूमिकेत असलेली पूजा हेगडे ही नवी जोडी दिसणार आहे. यासोबतच विनोदी कलाकार जॉनी लिव्हर आणि चंकी पांडे असून मराठी कलाकार शरद कोळकरसुद्धा असणार आहे.

दीपिका-रणवीरच्या लग्नपत्रिकेतल्या चुका झाल्या व्हायरल

First published: October 22, 2018, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading