'बाहुबली' फेम राणा दग्गुबती लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?

'बाहुबली' फेम राणा दग्गुबती लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, कोण आहे त्याची गर्लफ्रेंड?

राणानं त्याच्या साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : भारतीय सिनेमांच्या इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबलीमध्ये भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबतीनं लॉकडाऊनमध्येच आपल्या साखरपुड्याची घोषणा करत सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यासोबतच त्यांनं सांगितलं की, तो लवकरच गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबत लग्न करणार आहे. राणानं त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आणि यासोबत त्यानं मिहिकासोबतचा एक गोड फोटो सुद्धा शेअर केला आहे.

फिल्म इंडस्ट्रीमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर अशी ओळख असलेला राणानं आजवर त्यांच्या रिलेशनशिपबाबत सर्व माहिती प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवली होती. पण आता त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं आहे. भल्लालदेवची भूमिका साकारल्यानंतर राणा एवढा लोकप्रिय झाला होता की, बॉलिवूड सिनेमा द गाझी अॅटॅकमध्ये के. के. मेनन असतानाही राणाला लीड रोल देण्यात आला होता. अर्थात यानंतर तो कोणत्याही बॉलिवूड सिनेमात दिसला नाही.

View this post on Instagram

And she said Yes :) ❤️#MiheekaBajaj

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

राणानं त्याच्या साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याची सहकलाकार सामंथा अक्कीनेनी हिनंही त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. तिनं लिहिलं, 'मर गई मैं तो' याशिवाय सुपरस्टार अनिल कपूर यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलं, शुभेच्छा माझ्या हैदराबादी मुला. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तुम्हा दोघांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया, कियारा अडवाणी, सुशांत सिंह राजपूत, किर्ती खरबंदा यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यूज एजन्सी आयएएनएसच्या वृत्तानुसार मिहिता एक इव्हेट प्लानर आहे. ती ड्यू ड्रॉप डिजाइन स्टूडियोची मालकीण आहे. तिचा हा स्टूडियो मुंबईमध्ये आहे. मिहिकाच्या आधी राणाचं नाव तृष्णा कृष्णन आणि अनुष्का शेट्टी या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर राणाचा हाथी मेरा साथी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र त्याच्या रिलीज डेट बद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

First published: May 13, 2020, 12:24 PM IST

ताज्या बातम्या