गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार रामलक्ष्मण यांना जाहीर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार रामलक्ष्मण यांना जाहीर

संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लतामंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लतामंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण यांना प्रदान करण्यात येणार आहे. ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असा हा पुरस्कार लतादीदींच्या वाढदिवशी प्रदान करण्यात येतो. मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है सिनेमाला रामलक्ष्मण यांनी दिलेली गाणी हिट झाली होती.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा वाढदिवस त्यांचे चाहते एखाद्या सणासारखा साजरा करतात. खरं तर  दीदींच्या  संगीत विश्वातील प्रवासाबाबात जितकं बोलावं तितकं थोडंच आहे. दीदींच्या ९०व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्यांची बहीण मीना खडीकर यांनी लिहिलेल्या 'मोठी तिची सावली' या पुस्तकाचं मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात प्रकाशन होणारे.

या पुस्तकाचं प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते होणार असल्याने या कार्यक्रमाला संपूर्ण मंगेशकर कुटुंब आवर्जून उपस्थित राहील. प्रकाशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दीदींच्या गाण्यांचा एक खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आलाय. या पुस्तकाबद्दल दीदींना अद्याप कल्पना देण्यात आलेली नसल्याने हे पुस्तक त्यांच्यासाठी वाढदिवसाचं अनोखं सरप्राईज ठरेल.

गानकोकीळा लता मंगेशकरांचा आवाज आणि स्वभाव हा जरी मृदू, मुलायम आणि शांत असला तरी त्यांचा स्वभाव मात्र अत्यंत बाणेदार आहे. या बाणेदारपणाचा अनुभव प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनाही आला होता. गायकांच्या हितासाठी भांडणाऱ्या लता दीदींनी याच कारणांवरून रफी साहेबांसोबत गायला चक्क नकारही दिला होता. याचं नेमकं कारण काय होतं याचा किस्सा लता दीदींनीच 'न्यूज18 लोकमत'ला काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितला होता.

दीदी म्हणाल्या, त्या काळात पार्श्वगायकांना फार काही किंमत दिली जात नव्हती. गाण्यांची रॉयल्टीही मिळत नसे. मला हे पटलं नाही. गायकांनाही रॉयल्टी मिळाली पाहिजे अशी मी मागणी केली. त्यासाठी इतर गायकांनाही तयार केलं. याच कारणांमुळे आम्ही एचएमव्ही कंपनीसोबत गाणी करणं थांबवलं होतं.

Lata Mangeshkar Birthday : स्वर'लतेच्या' हिंदोळ्यावर...

First published: September 28, 2018, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading