S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

रामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग!

रामगोपालने त्याच्या इन्स्टाग्रावर चंद्रबाबू नायडू यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये नायडू व्हायएसआर काँग्रेस पक्षात सहभागी होताना दिसत आहेत.

Updated On: Apr 20, 2019 06:49 PM IST

रामगोपाल वर्माला फेक फोटो शेअर करणे पडले महाग!

हैदराबाद, २० एप्रिल- आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादात अडकणारा दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने कोणतंही वक्तव्य केलं नसलं तरी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर फेक फोटो शेअर केल्याप्रकरणी रामूविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रामगोपालने त्याच्या इन्स्टाग्रावर चंद्रबाबू नायडू यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये नायडू व्हायएसआर काँग्रेस पक्षात सहभागी होताना दिसत आहेत. हा फोटो देवीबाबू चौधरी यांना पसंत आला नाही. अखेर त्यांनी ताडेपल्ली गुडेम पोलीस स्थानकात रामगोपाल वर्माविरुद्ध तक्रार नोंदवली.

वर्माविरुद्ध तक्रार नोंदवणारे देवीबाबू याप्रकरणी म्हणाले की, ‘रामगोपाल वर्माची वागणूक चांगली नाही आणि यामुळे आंध्रप्रदेशमधलं वातावरण बिघडतंय. पोलिसांनी आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून ते याप्रकरणी चौकशी करतील असंही त्यांनी सांगितलं आहे.’


एवढंच बोलून देवीबाबू थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, ‘आमची लढाई इथेच थांबली नाही. तर जोवर रामगोपाल वर्मा चंद्रबाबू नायडू यांची माफी मागत नाहीत तोवर आम्ही हा लढा सुरुच ठेवू. मी तेलंगनामध्येही यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे.’

रामगोपाल वर्माने नुकताच लक्ष्मी एनटीआर सिनेमा तयार केला. यात आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या पत्नीवर सिनेमाची कथा साकारण्यात आली आहे. तसेच सिनेमात चंद्रबाबू नायडू यांची नकारात्मक व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे. सिनेमात त्यांना एनटीआरला दगा देणारे दाखवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close