रामदास पाध्येंच्या अर्धवटरावाला चीनमध्ये पसंती

रामदास पाध्येंच्या अर्धवटरावाला चीनमध्ये पसंती

गेले अनेक वर्ष आपलं मनोरंजन करणारे अर्धवटराव पोहलेत थेट चीनमध्ये. चीनच्या पाचव्या क्वांझुआ इंटरनॅशनल पपेटरी फेस्टिव्हलला अर्धवटराव भारताचं प्रतिनिधित्व करत होते.

  • Share this:

13 डिसेंबर : आपल्या भारतासाठी अजून एक अभिमानाची गोष्ट घडलीये. गेले अनेक वर्ष आपलं मनोरंजन करणारे अर्धवटराव पोहलेत थेट चीनमध्ये. चीनच्या पाचव्या क्वांझुआ इंटरनॅशनल पपेटरी फेस्टिव्हलला अर्धवटराव भारताचं प्रतिनिधित्व करत होते. तिथे त्यांना भरपूर पसंतही केलं गेलं आणि पाध्ये कुटुंबाचं खूप कौतुक केलं गेलं.

नुकतीच अर्धवटरावांनी शंभरी गाठलीये पण इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्यांचं मनोरंजन काही कमी झालेलं नाहीये. ही कमाल पाध्ये कुटुंबाचीच म्हणावी लागेल.

‘बोलक्या बाहुल्या’ म्हटले की मराठी माणसाला पहिले नाव आठवते ते रामदास पाध्ये यांचे. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून काही वर्षांपूर्वी रामदास पाध्ये यांनी ‘अर्धवटराव’ आणि ‘आवडाबाई’ या बाहुल्यांना घेऊन सादर केलेले कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘लिज्जत पापड’च्या जाहिरातीमधील ‘कर्रम कुर्रम लिज्जत पापड’ हे वाक्य प्रेक्षकांच्या ओठावर आहे.

महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘तात्या विंचू’ हा बाहुलाही प्रेक्षक विसरलेले नाहीत. ‘बोलक्या बाहुल्यां’च्या या संसारात रमलेल्या रामदास पाध्ये यांना त्यांच्या पत्नी अपर्णा यांची साथ मिळाली. आता रामदास व अपर्णा आणि त्यांची दोन मुले सत्यजित व परीक्षित आणि सत्यजितची पत्नी व रामदास-अपर्णा यांची सून ऋतुजा हे सगळेच कुटुंबीय ‘बोलक्या बाहुल्या’मय झाले आहेत.

First published: December 13, 2017, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading