आता रामदास आठवलेंचाही मुलगा चंदेरी दुनियेत

या चित्रपटांत 'अंडर १४ क्रिकेट टीम'ची कथा आहे आणि रामदास आठवले यांचा मुलगा जीत मुख्य भूमिका साकारत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2018 12:09 PM IST

आता रामदास आठवलेंचाही मुलगा चंदेरी दुनियेत

मुंबई, 02 आॅक्टोबर : सिद्धार्थ एंटरप्राइजेज आणि अंजली एंटरप्राइजेजद्वारा प्रस्तुत नवा मराठी चित्रपट ‘सोन्या’चा धमाकेदार मुहूर्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडला. चित्रपटांचे दिग्दर्शक मुरली लालवाणी आहेत. या चित्रपटांत 'अंडर १४ क्रिकेट टीम'ची कथा आहे आणि रामदास आठवले यांचा मुलगा जीत मुख्य भूमिका साकारत आहे. जीतच्या आईची भूमिका अभिनेत्री निशा परूळेकर करत आहे.

रामदास आठवले यांच्या हस्ते मुहूर्त क्ल्यॅप केला. चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं. यावेळी रामदास आठवले म्हणाले की,  मी नेता आहे तर माझा मुलगा अभिनेता बनला आहे, ही फारच सुखद आणि आनंदाची बाब आहे. जीतच्या फिल्मी दुनियेतील एंट्रीबद्दल त्याला शुभेच्छा.

अभिनेत्री निशा परूळेकर म्हणाली, ' या चित्रपटात मी एक सशक्त आणि कर्तबगार आई बनली आहे. मुलाचं क्रिकेटमध्ये भवितव्य घडवण्यासाठी भरपूर कष्ट घेते आणि आपल्या मुलाचं स्वप्न हालअपेष्टा सोसून पूर्ण करते.'

चित्रपटांचे दिग्दर्शक मुरली लालवाणी यांनी सांगितलं की,  'हा चित्रपट बनवणं माझ्यासाठी एक आव्हान आहे आणि हा सिनेमा उत्तम प्रकारे बनवणं हेच आता माझं ध्येय आहे.'

जीतसारखे हल्ली अनेक नवे चेहरे फिल्म इंडस्ट्रीत येतातय. राजकारण्यांचा मुलगा सिनेमात यायची घटना पहिलीच नाही. विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख तर हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमात लोकप्रिय ठरला. त्यानं निर्माता म्हणूनही आपलं स्थान बळकट केलंय.

Loading...

VIDEO : कृष्णा कपूर आणि नातू रणबीर यांच्यामध्ये असं होतं अनोखं शेअरिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2018 12:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...