रामदास आठवलेंच्या 'शोले'मध्ये कोण कुठल्या भूमिकेत?

'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी सांगितलं, त्यांना सभेमध्ये, पार्लमेंटमध्ये बसून कविता लिहिण्याची सवय आहे. रामदास आठवले यांना मकरंदनं विचारलं, शोले सिनेमामध्ये कोणती भूमिका साकारायला आवडली असती?

News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2018 02:01 PM IST

रामदास आठवलेंच्या 'शोले'मध्ये कोण कुठल्या भूमिकेत?

मुंबई, 13 डिसेंबर :  कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये कवी मनाचे नेते रामदास आठवले आणि महाराष्ट्राचा लाडका गायक आनंद शिंदे यांच्यासोबत मकरंद अनासपुरे यांनी दिलखुलास संवाद साधला आहे. त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं एकदम बेधडक तर काही उत्तरं एकदम खुशखुशीत पद्धतीने दिली. या गप्पा चांगल्याच रंगल्या. रामदास आठवले यांनी आनंद शिंदे यांच्या काही गाण्यांचा अर्थ देखील गंमतीदार पद्धतीने सांगितला आहे, तर आनंद शिंदे यांनी त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

सगळ्यांनाच माहिती आहे रामदास आठवले यांना उत्स्फूर्त कविता सुचतात आणि तो त्यांचा हातखंडाच आहे. कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी सांगितलं, त्यांना सभेमध्ये, पार्लमेंटमध्ये बसून कविता लिहिण्याची सवय आहे.  रामदास आठवले यांना मकरंदनं विचारलं, शोले सिनेमामध्ये कोणती भूमिका साकारायला आवडली असती? त्यावर रामदास आठवले म्हणाले, अमिताभ बच्चन यांची तर धर्मेंद्रची उद्धव ठाकरे आणि गब्बरची शरद पवार यांनी साकारली असती.

आनंद शिंदे यांनी त्यांच्या लहानपणाची आठवण सांगताना म्हणाले, 'माझ्या बारश्याला माझ्या वडिलांनी मला १०,००० रुपयांवर झोपवलं होतं. मला लहान असताना कधीच वाटलं नाही, गायक होईन. मला वाटलं होतं की, म्युन्सिपाल्टीमध्ये काम करेन. पण माझ्यात प्रल्हाद शिंदे यांचं रक्त आहे. त्यामुळेच आज मी गायक आहे.'

मकरंद यांनी आनंद शिंदे आणि रामदास आठवले यांना काही प्रश्न विचारले.  आनंद शिंदे यांना विचारलं, त्यांच्या आवडीचा गायक कोण,  मिलिंद शिंदे कि आदर्श शिंदे ?  आवडता नेता कोण, प्रकाश आंबेडकर की रामदास आठवले ? तसेच आवडता संगीतकार कोण, अवधूत गुप्ते की अजय अतुल ?

रामदास आठवले यांना विचारलं आवडता नेता कोण, राजा ढाले कि नामदेव ढसाळ ? उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण – शरद पवार की देवेंद्र फडणवीस ? तसेच कोणता पक्ष पुरोगामी बीजेपी कि कॉंग्रेस ? तसंच सभा जिंकून घेणारे कोण, नरेंद्र मोदी की बाळासाहेब ठाकरे ?

Loading...


VIDEO : स्वर्ग त्यापुढे फिका पडे, पहा ईशा अंबानीचा शाही लग्न सोहळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...