'फ्लाईंग जट्ट'ची मोठी उडी, साकारणार 'रॅम्बो'

हाॅलिवूडमधील सर्वोत्तम अॅक्शनपट ठरलेल्या 'रॅम्बो' या सिनेमाचा हिंदी रीमेक तयार करण्यात येतोय. या रीमेकमध्ये टायगर श्रॉफ हा जॉन रॅम्बोच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 20, 2017 04:03 PM IST

'फ्लाईंग जट्ट'ची मोठी उडी, साकारणार 'रॅम्बो'

20 मे : हाॅलिवूडमधील सर्वोत्तम अॅक्शनपट ठरलेल्या 'रॅम्बो' या सिनेमाचा हिंदी रीमेक तयार करण्यात येतोय. या रीमेकमध्ये टायगर श्रॉफ हा जॉन रॅम्बोच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'अ फ्लाईंग जट्ट' या सिनेमात सुपरहिरो झालेल्या टायगरसाठी रॅम्बो हा सिनेमा काहीसा आव्हानात्मक ठरणार आहे. कारण मूळ सिनेमात हॉलिवूड सुपरस्टार सिल्व्हेस्टर स्टेलॉन यांनी जॉन रॅम्बोची भूमिका साकारली होती. त्यावेळी स्टेलॉन यांच्या अभिनयाने या सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं.

खरंतर रॅम्बो सिनेमाचा हिंदी रीमेक बनवण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते. तसंच यातील जॉन रॅम्बोच्या भुमिकेसाठी  ऋतिक रोशन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. परंतु या सर्व चर्चांना बाजूला सारत टायगर श्रॉफच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

"मी या सिनेमाविषयी खूपच उत्सुक आहे पण सिल्व्हेस्टरला रीप्लेस करु शकणार नाही," असं या सिनेमाविषयी बोलताना टायगरने म्हटलंय. त्याचबरोबर पुढे बोलताना टायगर म्हणाला की, " अगदी लहानपणापासूनच मला अॅक्शन सिनेमांची आवड होती. आता मला विश्वास बसत नाहीय की,  मला सिल्व्हेस्टर सारख्या महान कलाकाराने साकारलेला रोल करायला मिळतोय." आपण लहानपणापासून करत असलेली तयारी यासाठी उपयोगी पडली असंही टायगरचं म्हणणंय.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाचं लवकरच शुटिंग सुरू होईल आणि 2018 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. मात्र, या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख अजून गुलदस्त्यातच आहे.

Loading...

यावर बोलताना सिद्धार्थ आनंद म्हणाले की, रॅम्बो हा सिनेमा माझ्या पीढीतील सर्वात प्रतिष्ठित अॅक्शन सिनेमा आहे. अगोदरच भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये रॅम्बोच्या क्षमतेच्या अॅक्शन हीरोंची कमतरता आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, टायगरला अॅक्शन हीरो म्हणून सादर करण्याची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2017 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...