'...आणि आम्ही इतिहास घडवला', 'सीता' दीपिका चिखलिया यांनी शेअर केला माजी पंतप्रधान राजीव गांधींबरोबरचा PHOTO
'...आणि आम्ही इतिहास घडवला', 'सीता' दीपिका चिखलिया यांनी शेअर केला माजी पंतप्रधान राजीव गांधींबरोबरचा PHOTO
रामायण मालिकेत 'सीता' ही भूमिका निभावणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये 'रामायण'ची संपूर्ण टीम माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांच्याबरोबर दिसत आहे.
नवी दिल्ली, 28 एप्रिल : लॉकडाऊनच्या काळात गेल्या काही दशकांपासून भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या जुन्या मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये 'रामायण'(Ramayana) या मालिकेने प्रेक्षकांची मनं तर पुन्हा जिंकली आहेतच पण त्याचबरोबर टीआपीमध्ये देखील बाजी मारली आहे. दरम्यान रामायण सुरू झाल्यानंतर या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतात. यामध्ये 'सीता' ही भूमिका निभावणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) सुद्धा सोशल मीडियावर खूप फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये 'रामायण'ची संपूर्ण टीम माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांच्याबरोबर दिसत आहे.
(हे वाचा-'लक्ष्मण' सुनील लहरींचा बॉलिवूडमध्ये रोमँटिक अंदाज,अभिनेत्रींबरोबरचे PHOTO VIRAL)
दिपिका यांनी या फोटो शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'आमचा पहिल्यांदा सन्मान होत होता. आम्हाला लक्षात आलं की आम्ही रामायणाच्या परंपरेचा एक भाग आहोत. आम्ही इतिहास घडवला होता. हा दिवस स्पष्टपणे आठवतोय जेव्हा आम्हाला दिल्लीमधून पंतप्रधानांनी भेटण्यासाठी कॉल केला होता.'
A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala) on
दिपिका यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी, रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल, रामानंद सागर आणि मालिकेतील इतर कलाकार दिसून येत आहेत. याआधी दीपिका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ठ आडवाणी यांच्याबरोबर देखील फोटो शेअर केला आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.