मुंबई, 29 एप्रिल : 'रामायण' (Ramayana) या दूरदर्शनच्या (Doordarshan) सर्वांत लोकप्रिय मालिकेत सीतेची (Seeta) भूमिका करून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दीपिका चिखलियांचा (Deepika Chikhalia) आज 55 वा वाढदिवस. 29 एप्रिल 1965 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला होता.'रामायण'ही मालिका लोकप्रिय झाली आणि त्यातली त्यांनी साकारलेली सीतेची भूमिकाही लोकप्रिय झाली. त्यामुळे आजही अनेक लोक त्यांना 'सीता' म्हणूनच ओळखतात. त्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली असली, तरी त्यांचं बाकीचं काम थोडं झाकोळलं गेलं. 'रामायण'व्यतिरिक्त अन्यही अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दीपिका यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या अन्य काही भूमिकांबद्दल जाणून घेऊ.
सिनेमे
दीपिका चिखलिया यांनी 1983 मध्ये फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं. 'सुन मेरी लैला' सिनेमात केलेल्या अभिनयाचा सर्वांवर प्रभाव पडला होता. दीपिका यांनी भगवानदादा (1986), चीख, खुदाई, रात के अंधेरे में अशा सिनेमांमध्ये काम केलं होतं. 'आशा ओ भालोबाशा' या बंगाली, तसंच 'नांगल' (1992) या तमिळ सिनेमातूनही त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचं दर्शन घडवलं.
हे वाचा - Ratris Khel Chale… पाहा अण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवंता
अलीकडच्या काळात दीपिका यांनी 'बाला' (Bala) या सिनेमात काम केलं होतं. आयुष्मान खुराना, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. दीपिका यांनी या सिनेमात यामी गौतमच्या आईची भूमिका निभावली होती. सरोजिनी नायडू (Sarojini Naidu Biopic) यांच्या बायोपिकमध्येही दीपिका लवकरच दिसणार आहेत.
मालिका
रामायण मालिकेत सीतेची भूमिका करून दीपिका यांना घराघरात ओळख मिळाली. त्याव्यतिरिक्तही अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. रामानंद सागर यांच्याच 'विक्रम और बेताल' या मालिकेतही त्यांनी काम केलं होतं. तसंच लव-कुश, दादा-दादी की कहानी, द स्वोर्ड ऑफ टिपू सुलतान अशा अन्य काही मालिकांमध्येही दीपिका यांची भूमिका होती.
राजकीय क्षेत्र
मनोरंजन क्षेत्रासोबतच दीपिका यांनी राजकीय क्षेत्रातही आपलं नशीब आजमावून पाहिलं आहे. 1991 मध्ये त्यांनी वडोदरा (Vadodara) मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी राजा रणजितसिंह गायकवाड यांना 50 हजार मतांनी हरवलं होतं. सध्या दीपिका चिखलिया आपल्या दोन मुली आणि पती हेमंत टोपीवाला (Hemant Topiwala) यांच्यासह सुखी जीवन जगत आहेत.
हे वाचा - करीना कपूरचा चढला पारा; बेशिस्त नागरिकांना सुनावले खडेबोल
गेल्या वर्षी कोरोनामुळे पहिल्यांदा देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतररामायण मालिका दूरदर्शनवरून पुनःप्रसारित करण्यात आली होती. त्या वेळीही रामायण या मालिकेने प्रेक्षक संख्येचा विक्रम केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actress