enteमुंबई 18 एप्रिल: देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रामायण (Ramayan) या मालिकेमुळं ती खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचली. आज तिचा वाढदिवस आहे. 38 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र आपल्या वाढदिवशी देबिना बिलकूल खुश नाही. कारण लॉकडाउनमुळं घरातच राहून तिला आपल्या वाढदिवस साजरा करावा लागत आहे. (Coronavirus lockdown) गेल्या वर्षीचा वाढदिवस लॉकडाउनमध्ये गेला अन् यावेळी देखील तिच परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळं देबिना काहीशी नाराज आहे.
देबिनानं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या लॉकडाउनवर आपली काहीशी नाराजी व्यक्त केली होती. “या लॉकडाउनमुळं माझा वाढदिवस घरातच साजरा होणार आहे. अर्थात सरकारचा निर्यण योग्य आहे. कोरोनाचा प्रसार वाढतोय. पण वाढदिवस देखील वर्षातून एकदाच येतो पण यावेळी देखील कुटुंबीयांशिवाय तो साजरा करावा लागणार आहे.” अशी खंत तिनं व्यक्त केली. पण सोबतच लॉकडाउन संपताच ती कुटुंबीयांना जाऊन भेटणार अन् त्यांच्यासोबत पुन्हा एकदा वाढदिवस साजरा करणार असा निश्चय तिनं केला आहे.
अवश्य पाहा - पहिल्याच चित्रपटात पूनम ढिल्लोन यांनी शशी कपूर यांना मारली होती थोबाडीत; कारण...
लॉकडाउनमध्ये कुठल्या सेवा सुरु आहेत?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bold photoshoot, Entertainment, Tv actress