सवाई गंधर्व महोत्सवाआधीच वादाचे सूर, यंदा रमणबागेत सूर घुमणार नाही

सवाई गंधर्व महोत्सवाआधीच वादाचे सूर, यंदा रमणबागेत सूर घुमणार नाही

  • Share this:

पुणे, 08 आॅक्टोबर : गेल्या 30 वर्षांपासून पुण्यातल्या रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात पार पडणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवासाठी, यंदा नवीन जागा शोधावी लागणार आहे. कारण रमणबाग शाळेच्या व्यवस्थापनानं सवाई गंधर्व महोत्सवासाठी परवानगी नाकारलीय. आयोजक श्रीनिवास जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

सवाई गंधर्व महोत्सवाच्या वेळी वाहतूक कोंडी होत असल्याची सबब शाळेकडून देण्यात आल्याचं समजतंय. दरम्यान, गेल्यावर्षी संभाजी ब्रिगेडनंही वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत सवाई गंधर्व महोत्सवाला विरोध केला होता.

यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवासाठी आयोजकांकडून नवीन जागेचा शोध सुरू आहे.

आयोजकांनी एक पत्रक प्रसिद्ध केलंय. गेली सुमारे तीन दशके हा महोत्सव डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग इथं आयोजित करण्यात येत आहे. मात्र यावर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी शाळेचे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे लेखी कळवले आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या महोत्सवाच्या आयोजनापुढे जागेचीच समस्या उभी राहिली आहे.

केवळ अभिजात संगीताचा जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा म्हणून या महोत्सवाकडे पाहिले जाते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृतिनिमित्त १९५२ मध्ये या उत्सवाला प्रारंभ केला. केवळ एका घराण्याचे संगीत संमेलन असं या संगीतोत्सवाचे स्वरूप न ठेवता देशभरातील अनेक उत्तमोत्तम गायक वादकांसाठीचे स्वरपीठ निर्माण व्हावे, असा प्रयत्न भीमसेनजींनी सातत्याने केला.

उत्तम संगीत ऐकण्यासाठी किमान तिकिट असायला हवे आणि रसिकांना उत्तम संगीत ऐकवले, तर ते त्याबाबत कधीच तक्रार करीत नाहीत,हेही या महोत्सवाने दाखवून दिले आहे.

अशा पार्श्वभूमीवर यंदा महोत्सव आला असताना मैदान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे मंडळाला महोत्सव आयोजित करण्यासाठीच्या तयारीला कमी अवधी मिळणार आहे. शक्य त्या सर्व शक्यता मंडळाच्या वतीने आजमावल्या जात असून काही शुभघटना घडलीच तर त्याबाबत रसिकांना तातडीने कळवण्याची व्यवस्था केली जाईल.-आर्य संगीत प्रसारक मंडळ

===============================================

नवरात्रीत राधिका आणि शनायामध्ये रंगणार स्पर्धा, कोण बनणार किचन क्वीन?

First published: October 8, 2018, 8:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading