Home /News /entertainment /

Trailer: कॉमेडीच्या धुमधडाक्याने नववर्षाची सुरुवात; 1 जानेवारीला 'Ram Prasad ki Tehrvi' होणार प्रदर्शित

Trailer: कॉमेडीच्या धुमधडाक्याने नववर्षाची सुरुवात; 1 जानेवारीला 'Ram Prasad ki Tehrvi' होणार प्रदर्शित

'राम प्रसाद कि तेहरवी'(Ram Prasad ki Tehrvi) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ह्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. सिनेमात उत्तर भारतातील एका कुटुंबातील 5 मुलांची कहाणी आहे. या 5 मुलांच्या वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक नात्यांची ही गोष्ट आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 डिसेंबर: अभिनेत्री सीमा पाहवा (Seema Pahwa) दिग्दर्शित ‘राम प्रसाद की तेहरवी’ (Ram Prasad Ki Tehrvi)हा चित्रपट 1 जानेवारी 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला एखादा गंमतीदार चित्रपट बघायचा असेल तर 'राम प्रसाद की तेहरवी' हा उत्तम पर्याय आहे. ट्रेलर बघून राम प्रसाद की तेहरवी हा फॅमिली ड्रमा सिनेमा असल्याचं कळते. सिनेमात उत्तर भारतीय  कुटुंबातील 5 मुलांची कहाणी आहे. सिनेमात नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah), सुप्रिया पाठक (Supriya Pathak), कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen Sharma), विनय पाठक (Vinay Pathak), विक्रांत मस्से (Vikrant Massey) आणि मनोज पाहवा (Manoj Pahwa) सारखी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. सिनेमात वडील रामप्रसाद वारल्यानंतर 13 दिवसाची कहाणी बघायला मिळणार आहे. यापूर्वी सीमा पाहवा अभिनेत्री म्हणून बरेली कि बर्फी (Bareilly Ki Barfi), दम लागा के हैशा (Dum Laga ke Haisha), बाला (Bala) सारख्या बहुचर्चित सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसली. पण ‘राम प्रसाद की तेहरवी’ हा सीमा पाहवाने पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे अभिनयात हातखंडा असलेली सीमा आता दिग्दर्शक म्हणून मोठ्या पडद्यावर काय कमाल दाखवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. ‘राम प्रसाद की तेहरवी’ बद्दल सिमला विचारले असता ती म्हणाली,अभिनयापासून लेखन-दिग्दर्शनापर्यंत हा एक लांबचा प्रवास आहे. तिने घेऊन आलेल्या या नव्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याबद्दल ती सगळ्या सहकलाकारांचे आभार व्यक्त केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood actress, New year

    पुढील बातम्या