‘बडे अच्छे...’ फेम अभिनेता राम कपूरनं कमी केलं 30 किलो वजन, सोशल मीडियावर शेअर केलं हे 'सिक्रेट'

‘बडे अच्छे...’ फेम अभिनेता राम कपूरनं कमी केलं 30 किलो वजन, सोशल मीडियावर शेअर केलं हे 'सिक्रेट'

रामच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकल्यास तो त्याच्या फिटनेसवर सध्या खूपच लक्ष देत असल्याचं दिसून येतं.

  • Share this:

मुंबई, 9 जुलै : अभिनेता म्हटलं नेहमीच आपल्या डोक्यात येतो ती हॅन्डसम आणि फिट, सिक्स अ‍ॅब्स असलेली व्यक्ती. मात्र इंडस्ट्रीमध्ये असाही एक अभिनेता आहे ज्यानं 96 किलो वजन असतानाही प्रेक्षकांची मनं जिंकली, पण त्यानंतर मात्र वाढतं वजन मनावर घेऊन कमी केलं. त्यानं तब्बल 30 किलो वजन कमी केलं आहे. त्यानं त्याच्या लठ्ठपणालाही चार्मिंग कसं बनवलं हे त्यानंच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.त्याचे हे Before/  After फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  हा अभिनेता म्हणजे ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील राम कपूर. रामनं नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. जे पाहिल्यानंतर त्याचे सर्व चाहते चकित झाले. सुरुवातीला तर हा राम कपूर आहे यावर कोणाचा विश्वासच बसला नाही. कारण रामचे सुरुवातीचे गलेलठ्ठ फोटो आता एकदम फिट अँड फाईन दिसत आहेत. आता राम पूर्णपणे वेगळा दिसत आहे.

राम कपूरनं त्याचा लेटेस्ट फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राम कपूरचं अगोदरचं वजन पाहता त्याच्या आत्ताच्या फोटोंवर विश्वास ठेवणं त्याच्या चाहत्यांना कठिण जात आहे. 96 किलो वजन असतानाही राम खूप चार्मिंग दिसत असे मात्र आत्ताच्या लुकमध्ये तो आणखीनच हॅन्डसम दिसत आहे. रामच्या या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये त्याची पत्नी गौतमीचा हात असल्याचं बोललं जात आहे. गौतमी फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक असून तिनंच रामला त्याचं वजन कमी करण्यासाठी प्रेरित केलं असल्याचं म्हटलं जात आहे.

Psycho Saiyaan च्या प्रेमात पडली श्रद्धा कपूर, ही भानगड आहे तरी काय?

 

View this post on Instagram

 

Wassssup peeps!! Long time no see

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

रामच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकल्यास तो त्याच्या फिटनेसवर सध्या खूपच लक्ष देत असल्याचं दिसून येतं. रामनं त्याच्या इन्स्टाग्रामवर अनेक जिम व्हिडिओ आणि सेल्फी शेअर केले आहेत.

संजय दत्तच्या 'या' मराठी सिनेमात येणार बॉलिवूडचा हुकूमी एक्का, पाहा टीझर

 

View this post on Instagram

 

Hakasan Las Vegas

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

असं कमी केलं वजन

वेट लॉस सिक्रेटबद्दल राम कपूरनेच स्वतः सांगितलं आहे. स्ट्रीक्ट डाएट तो फॉलो करत होता. फक्त दोन वेळा तो जेवत असे. दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान काहीतरी खाणं झालं की त्यानंतर अगदी काहीही न खाणं हा नियम त्यानं काटेकोरपणे पाळला. स्ट्रीक्ट डाएटमुळेच तो 30 किलोपर्यंत वजन घटवू शकला.

रामनं आता पर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. ज्यात 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसम से', 'बड़े अच्छे लगते हैं' यांचा समावेश आहे. याशिवाय त्यानं 'गोलमाल रिटर्न्स', 'स्टूडेंट ऑफ द ईयर', 'हमशकल्स' आणि 'लवरात्रि' यासारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. टीव्ही वरील त्याच्या बेस्ट परफॉर्मन्ससाठी त्याला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत.

Batla House Teaser- ‘तब तक यही जंग जारी रहेगी.. ये बाजी कभी ना तुम्हारी रहेगी’

=====================================================================

SPECIAL REPORT: बॉटल कप चॅलेंजचा 'हा' नवा ट्रेन्ड तुम्ही पाहिला का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 03:00 PM IST

ताज्या बातम्या